🌟अनुदानाचा वाढिव टप्पा मिळेपर्यत बोर्डाच्या पेपर तपासणीवर बहिष्कार......!


🌟शिक्षक संघटनेचे प्रशासनाला लेखी निवेदन सादर🌟

फुलचंद भगत

वाशिम :- दि.१ जानेवारी २०२४ पासून अनुदानाचा पुढील वाढीव टप्पा वाढ मिळेपर्यंत अंशत: अनुदानित शिक्षक तथा प्राध्यापकांचा इयत्ता १० वी व १२ वी बोर्ड परिक्षा पेपर तपासणीवर बहिष्कार राहिल असे लेखी निवेदन मंगरुळपीर येथील तहसिलदार तसेच शिक्षण विभागाला दिले आहे.

                 अनुदानाचा वाढिव टप्पा मीळावा यासाठी याआधीही विविध प्रशासकीय स्तरावर निवेदने देन्यात आले आहेत.माशाअ२०२३ प्र.क्र.२८५/एसएम-४, दि. ०९/११/२०२३ चे मा. शिक्षण उपसचिव यांचे पत्र.२) दि. ०३ जानेवारी २०२४ पासून सुरु असलेले आझाद मैदान, मुंबई येथील धरणे आंदोलन या संदर्भानुसार दि. ०३ जानेवारी २०२४ पासून मुंबई येथील आझाद मैदानावर अंशत: अनुदानित शाळेतील शिक्षकांना अनुदानाचा पुढील वाढीब टप्पा या मागणीसह इतर मागण्यांकरिता बेमुदत धरणे आंदोलन सुरु असून, अद्यापपर्यंत सदरील मागण्यांबाबत शासनस्तरावरुन कोणतीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे राज्यातील सर्व विभागीय मंडळामध्ये सुरु असलेल्या इयत्ता १२ वी बोर्ड परिक्षा व मार्च पासून सुरु होणाऱ्या इयत्ता १० वी बोर्ड परिक्षा पेपर तपासणीवर सर्व अंशत: अनुदानित शाळेतील शिक्षकांच्या सर्व मागण्या मान्य होवून दि. ०१ जानेवारी २०२४ पासून प्रत्येक वर्षी अनुदानाचा वाढीव टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित करेपर्यंत पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्यात येत आहे असा लेखी निवेदनाव्दारे इशारा प्रशासकीय यंञणांना दिला आहे.सदर निवेदनावर प्रा.विनोद एस.भगत,मितल भेले,एस एन ऊजवणे,एस एन निकम,एम एच बारड,एस एच डोफेकर,आ.म.कोसे,आर व्ही चौधरी,एस एस अवगण,डी.एस गवारगुरु,अतुल गावंडे,घनश्याम गावंडे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या