🌟विदर्भकन्या अपूर्वा देशमुख हिची अभिनय कलेतील अपूर्व वाटचाल...!


🌟 अल्पकालावधीतच अपूर्वाने अभिनय क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची छाप सोडली🌟

अकोला : अभिनय क्षेत्रात आपल्या कलासाधनेतील कौशल्याने प्रगतीचं उल्लेखनीय स्थान कायम करण्यासाठी अविरत मेहनत करणारी अपूर्वा कला क्षेत्रात अपूर्व वाटचाल करीत आहे.ही उदयोन्मुख कलाकार सिरियलच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात आपल्या क्षमता सिध्द करीत पुढे आलेली आहे. ती नागपूरातील अपूर्वा मिनरल्स या कंपनीचे संचालक व लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे विदर्भ विभागीय संघटन तथा संपर्क प्रमुख श्री अरविंदराव देशमुख,भामोदकर  यांची कन्या आहे.

    तिने नागपूर येथून आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ॲन्ड रिसर्च सेंटर मधून एमबीए पूर्ण केले.प्रथमपासून अभिनयाची असलेली आवड जोपासत नंतर किशोर नमिता कपूर ॲक्टींग इन्स्टिट्यूटमधून दोन वर्षांचा अभिनय प्रशिक्षण कोर्स पूर्ण केला.आपल्या आवडीच्या क्षेत्रातच प्रगती करून  स्थिरावण्याचे ध्येय घेऊन ॲक्टींग प्रशिक्षणाचे धडे घेत ती सध्या मुंबईमध्ये अनेक सिरियलमध्ये सक्रिय आहे.जाहिरात शुटींगमध्ये ती दुबईला पण होती.यापूर्वी 'जय जय स्वामी समर्थ' 'परशुराम' 'अहिल्याबाई' नंतर सध्या स्टार प्लसच्या 'आंख मिचौली' सिरिजच्या शुटींमध्ये ती सक्रिय आहे! स्वतःच्या अभिरूचीला न्याय देत सर्व क्षमतांनी प्रयत्नातील सातत्य,मेहनतपूर्ण सरावाने विविध भूमिकांमधून अभिनय क्षेत्रात आपले आगळे वेगळे स्थान निर्माण करण्याचा तिचा मनोदय आहे.या यशाकडे जाणाऱ्या प्रवासासाठी तिला समाजातून अनेकांनी स्नेहपूर्ण शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

   तिच्या अभिनय क्षेत्राच्या वाटचालीचा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या महाराष्ट्र राज्य संघटन व संपर्क प्रमुख,महाराष्ट्र २४ तास च्या संपादिका अमिता कदम यांनी तिची मुलाखत घेऊन तिच्या धडाडीच्या संघर्षशील प्रवासाचा प्रेक्षकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे......

===========================


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या