🌟मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी महाडीबीटीवर अर्ज करण्याचे आवाहन......!


🌟आवाहन जिल्हा समाज कल्याण आधिकारी श्रीमती गीता गुट्टे यांनी केले आहे🌟

परभणी (दि.07 फेब्रुवारी) : शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन पध्दतीने महाडीबीटी प्रणालीद्वारे राबविण्यात येणार आहेत. सैनिकी शाळेत शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, इ. 9 वी 10 वी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणान्या पालकांच्या पाल्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, 5 वी ते 7 वी आणि इ. 8 वी ते 10 वी मधील अनुसूचित जातीच्या विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती,  माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती,  महर्षि विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क या  सर्व योजनांची ऑनलाईन अर्ज नोंदणी करणेकरीता पुढीलप्रमाणे कार्यप्रणाली अवलंब करण्यात यावा.

महाडीबीटी प्रणाली वेब लिंक- https://prematric.mahait.org/Login/Login,  मुख्याध्यापक लॉगीन तयार करून महाडीबीटी पोर्टलवर प्री-मॅट्रिक योजनांसाठी अर्जाच्या, नोंदणीसाठी, शाळेच्या मुख्याध्यापकांनी यूजर आयडीमध्ये Pre_SE२७XXXXXXXXX_Principal आणि पासवर्डमध्ये Pass७१२३ टाइप करून लॉग इन करावे.  शाळेचे प्रोफाईल अद्ययावत करणे- यामध्ये शाळेची, मुख्याध्यापकांची व लिपिकाची माहिती  अद्ययावत करावी.  विद्यार्थी प्रोफाईल अद्ययावत करणे यामध्ये विद्यार्थ्यांची वैयक्तिक व शैक्षणिक माहिती अद्ययावत करावी.

योजनेची निवड करणे यामध्ये संबंधित विद्यार्थी ज्या योजनेसाठी पात्र आहे त्या योजनेकरीता अर्ज नोंदणी करावी.तरी संबंधीत सर्व शाळेच्या मुख्यध्यापकांनी नमूद केलेल्या योजनांचे पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज महाडीबीटी प्रणालीमध्ये नोंदणी करण्यात यावी तसेच याबाबतीत दिरंगाई होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा समाज कल्याण आधिकारी श्रीमती गीता गुट्टे यांनी केले आहे.......

****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या