🌟नांदेड गुरुद्वाऱ्यावर सरकारने लादलेल्या नवीन कायद्या विरोधातील आंदोलनात सिख समुदायातील वरिष्ठ नागरिकांचाही सहभाग....!


🌟 सचखंड गुरुद्वारा बोर्डावर सरकारने लादलेल्या नवीन कायद्या विरोधातील साखळी उपोषण आंदोलनाचा आज २० वा दिवस🌟

🌟विद्युत महावितरण कंपनीचे मा.संचालक उत्तम झाल्टे व मा.मुख्य अभियंता रामदास कांबळे यांची साखळी उपोषणस्थळी भेट🌟 


नांदेड (दि.२८ फेब्रुवारी) राज्य सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या दिल.०५ फेब्रुवारी २०२४ रोजी झालेल्या बैठकीत सिख धर्मियांसह गुरसिखीवर अपार श्रद्धा असणाऱ्यांची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदेड येथील पवित्र तख्त सचखंड गुरुद्वाऱ्यावर गुरुद्वाऱा अधिनियम-२०२४ हा कायदा लादल्याने तसेच तत्पूर्वी २०२६ मध्ये गुरुद्वाऱा ॲक्ट १९५६ मधील कलम ११ मध्ये संशोधन करून गुरुद्वाऱा बोर्ड अध्यक्ष निवडण्याचा हुजूरी सिख समुदायाचा मुलभूत धार्मिक अधिकार हिरावून घेतल्यामुळे सरकारच्या या बेबंदशाही विरोधात मागील २० दिवसापासून सिख बांधव आंदोलन करत असतांना प्रशासनाकडून या साखळी उपोषण आंदोलनाकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत असल्याने प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. आज बुधवार दि.२८ फेब्रुवारी रोजी या साखळी उपोषण आंदोलनाच्या विसाव्या दिवशी आंदोलनात स्थानिक हुजूरी सिख समाजातील जेष्ठ मान्यवर नागरिकानी सक्रिय सहभाग नोंदवून साखळी उपोषणास सुरुवात केली या जेष्ठ मान्यवरांमध्ये सरदार नरेंद्रसिंघ बुंगई, सरदार इंदरसिंघ सरदार,सरदार जसवंतसिंघ जक्रेवाले,सरदार भागिंदरसिंघ पत्रे,सरदार बलवंतसिंघ संधु आदींचा समावेश असुन या साखळी उपोषणस्थळी आज विद्युत महावितरण कंपनीचे मा.संचालक उत्तम झाल्टे व मा.मुख्य अभियंता रामदास कांबळे यांनी देखील भेट देऊन जेष्ठ आंदोलकांची आस्थेवाईकपणे विचारपूस करीत आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला. 

 राज्यातील सत्ताधारी पक्षांच्यावतीने पवित्र तख्त सचखंड गुरुद्वाऱ्यावर लादलेल्या गुरुद्वारा बोर्ड अधिनियम-२०२४ या कायद्या विरोधातील आंदोलक सिख बांधवांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या जात असल्याचे निदर्शनास येत असून जिल्हा प्रशासनाकडून देखील आंदोलनकर्त्या हुजूरी सिख समुदायाला गोलमाल उत्तरे देऊन आंदोलन थांबविण्यासाठी दिलेल्या पत्रांवर आंदोलनकर्त्या हुजूरी सिख समुदायाने अविश्वास दाखवीत आपल्या न्यायिक मागण्यांसाठी सुरु केलेले साखळी उपोषण आंदोलन कायम  ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

  नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील साखळी उपोषणाच्या २० व्या दिवसी उपोषणास बसलेल्या हुजूरी सिख समुदायातील जेष्ठ उपोषणार्थीं मान्यवरांना स.रवींद्रसिंघ बुंगई,स.निलकमलसिंघ बुंगई, स.दुलिन्दरसिंघ संधु,स.भोलासिंघ गाडिवाले,स.महेंद्र सिंघ पैदल,स.इंदरजितसिंघ गडगंज,स.केवलसिंघ चिरागीया,स.रेखासिंघ पुजारी,स.दिलीपसिंघ रागी,स.जरनैलसिंघ गाडीवाले,स.जसपालसिंघ लांगरी,स.दिपकसिंघ हजुरीया,स.मनबीरसिंघ ग्रंथी,स.जसबीरसिंघ बुंगई,स.जगजीतसिंघ खालसा,स.रविंद्र सिंघ पुजारी,स.जगदीपसिंघ सिंघ नंबरदार,  स.प्रेमजीतसिंघ शिलेदार,स.गुरदेवसिंघ रामगडिया,स.प्रेमज्योतसिंघ सुखई,स.बक्षीसिंघ पुजारी यांच्यासह शेकडो हुजूरी सिंगांनी आज जाहीर पाठिंबा देत आंदोलत सहभाग घेतला......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या