🌟पुर्णा येथील २१ वी बौद्ध धम्म परिषद प्रेरणा देणारी - भन्ते रेवत बोधी


🌟पुर्णा शहर हे धम्म चळवळीचे केंद्र आहे यांची प्रेरणा निर्माण होत असल्याचा धम्म उपदेश देखील यावेळी त्यांनी दिला🌟

पुर्णा (दि.०१ फेब्रुवारी) - पुर्णा येथे डॉ.बी.आर आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार पूर्णा यांच्या वतीने स्मृतिशेष उपाली थेरो यांच्या ४१ व्या स्मृति दिनाच्या निमिताने बुधवार दि.३१ जानेवारी व ०१ फेब्रुवारी रोजी बौद्ध धम्म परिषदेचे करण्यात आले या निमित्ताने आज गुरुवार दि १ फेब्रुवारी रोजी ०३-०० वाजता दुसऱ्या दिवशीच्या धम्म परिषदेस सुरुवात झाली यावेळी भगवान बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्रिशरण पचशिल ग्रहण करण्यात आले.

 यावेळी प्रमुख उपस्थिता मध्ये पूभदत डॉ खेमधम्मो महाथेरो भदंत शरणानंद महाथेरो भदंत डॉ उपगुप्त महाथेरो भदंत इंदवंश महाथेरो भन्ते महाविरो भदंत सत्यपाल महाथेरो भन्ते पंयातीस भन्ते पंयावंश भन्ते पंयानंद भन्ते बोधी धम्मा भन्ते संघप्रिय प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश कांबळे ॲड हर्षवर्धन गायकवाड इंजि भिमप्रकाश गायकवाड साहेबराव सोनवणे यांच्या सह श्रामणेर संघ बौद्ध उपासक उपासिका यांची उपस्थित होती यावेळी रेवत बोधी म्हणाले की पूर्णा येथील धम्म परिषदेची प्रेरणा घेवून महाराष्ट्रात धम्म परिषदा होत आहेत धम्माचा प्रचार प्रसार होत आहे प्रबोधन होत आहे पूर्णा शहर हे धम्म चळवळीचे केंद्र आहे यांची प्रेरणा निर्माण होत असल्याचा धम्म उपदेश दिला......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या