🌟वाशिम जिल्ह्यात जात पडताळणी प्रमाणपत्र वितरित होणार ; ११ मार्चपर्यंत विशेष मोहीम.....!


🌟या विशेष मोहिमेंतर्गत जात वैधता प्रकरणे नियमानुसार निकाली काढण्याच्या दृष्टीने विविध कार्यक्रम🌟

फुलचंद भगत

वाशिम : आद्यक्रांतीकारक उमाजी नाईक प्रमाणपत्र अभियानांतर्गत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, वाशिमच्यावतीने इयत्ता ११ वी, १२ वी विज्ञानमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सीईटी देणाऱ्या विद्यार्थी तसेच सेवा व निवडणूक अर्जदारास ॲानलाईन व्हॅलिडिटी प्रमाणपत्र प्रदान करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

या विशेष मोहिमेंतर्गत जात वैधता प्रकरणे नियमानुसार निकाली काढण्याच्या दृष्टीने विविध कार्यक्रमाचे जसे जलद गतीने सुनावण्या, त्रुटी प्रकरणांवर त्वरित कार्यवाही होण्यासाठी त्रुटी निवारण शिबीरे, दक्षता पथक शिबीरे,जात वैधता प्रमाणपत्र कार्यपद्धती कार्यशाळा मार्गदर्शन शिबीर,ऑनलाईन वेबीनार,जात वैधता प्रमाणपत्र वाटप शिबीर इत्यादी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.संबंधित अर्जदारास किंवा पालकांना एसएमएस व ईमेलद्वारे याबाबत सूचना देण्यात येतील. या विशेष मोहिमेंतर्गत होणाऱ्या कार्यक्रमाचा लाभ विद्यार्थी व अर्जदारांनी घ्यावा, असे आवाह न समिती कार्यालयाच्यावतीने करण्यात येत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या