🌟परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात संत गाडगेबाबा यांना जयंतीनिमित्त अभिवादन...!


🌟अपर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन🌟 

परभणी (दि.23 फेब्रुवारी) : थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, तहसिलदार श्रीराम बेंडे, नायब तहसीलदार प्रशांत वाकोडकर, श्रीमती सुरेखा पटवे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते...... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या