🌟माणसाला ग्रंथ वाचन संस्कृती उर्जावंत बनवते - प्रा.इंद्रजित भालेराव


🌟स्वा.सै.सूर्यभानजी पवार महाविद्यालयात मराठवाडा स्तरीय ग्रंथालय कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी ते म्हणाले🌟 

पूर्णा (दि.७० फेब्रुवारी) - प्रत्येक माणसाला ग्रंथ वाचन संस्कृती ही ऊर्जावंत बनवत असते असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा सुप्रसिद्ध कवी प्रा.इंद्रजीत भालेराव यांनी केले ते स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार यांच्या तृतीय पुण्यस्मरणाचे औचित्य साधून मराठवाडा विभाग ग्रंथालय संघ व स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा स्तरीय ग्रंथालय कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी केले. ग्रामीण भागातील ग्रंथालय चळवळ ही टिकली तरच पुढील पिढी सक्षम बनेल म्हणून ग्रंथालय चळवळीत प्रामाणिक कार्यकर्त्यांनी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत . तसेच वाचकांनी दर्जेदार पुस्तके विकत घेऊन वाचली पाहिजेत असे आवाहनही त्यांनी यावेळी आपल्या मार्गदर्शनात केले. स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार यांच्या तृतीय पुण्यस्मरण कार्यक्रमा निमित्ताने प्रा.इंद्रजित भालेराव यांनी त्यांच्या जीवन कार्यावर सविस्तर असा प्रकाश टाकला. 


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार यांनी केले तर प्रा. योगेश्वरी पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी  मार्गदर्शक माजी आमदार गंगाधर पटणे, डॉ. राजेंद्र कुंभार ,डॉ. नंदकुमार दहिभाते , विभागीय सहाय्यक ग्रंथालय संचालक,सुनील हुसे , डॉ. धर्मराज वीर , डॉ. नामदेव दळवी आदी मान्यवरांनी या कार्यशाळेत सविस्तर असे मार्गदर्शन करतांना  स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार यांच्या जीवन कार्यावरही भाष्य केले .याप्रसंगी विचारमंचावर भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो, माजी नगराध्यक्ष उत्तमराव कदम, संस्थेचे अध्यक्ष गुलाबराव कदम,खंडेराव सरनाईक, वसंतराव सूर्यवंशी, नरहरी मंठेकर, भास्कर पिंपळकर राजेंद्र सानप, संतोष ससे आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार यांनी  आपल्या अध्यक्षीय भाषणात ग्रंथालय चळवळीतील समस्या आणि कार्यकर्त्यांचे प्रश्न यावर सविस्तर भाष्य केले . ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्त्यांनी शासन दरबारी समस्या सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन अग्रेसर राहिले पाहिजे असे  त्यांनी  कार्यकर्त्यांना आवाहन केले.स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार यांच्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त घेण्यात आलेल्या विभागीय कार्यशाळेत पवार कुटुंबातील अनेक सदस्य, ग्रंथालय चळवळीतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

या कार्यक्रमांमध्ये स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार यांच्या स्मरणार्थ " स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार सेवा गौरव पुरस्काराने " सुनील वाळवळ ,बुलढाणा प्रा.चंदा सुपेकर,पुणे प्रा.डॉ.राहुल देशमुख, धाराशिव महेश कुबडे,जिंतूर व श्री. छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक वाचनालय, शिवपुर यांना सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी प्रा .सुजाता घन यांनी आपल्या स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. संजय कसाब यांनी केले तर आभार अनिरुद्ध पवार यांनी मानले.

 या कार्यक्रमासाठी पवार कुटुंबातील सदस्य,वझुर येथील गावकरी , मराठवाड्यातील सार्वजनिक ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व शासकीय पदाधिकारी, महाविद्यालयातील प्राध्यापक ,कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक,कर्मचारी व विद्यार्थ्यांनी यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या