🌟परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील श्री साईबाबा जन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी ५० कोटी रुपयांचा निधी.....!


🌟राज्य सरकारने जिल्हा प्रशासनास वितरीत केला ५० कोटी रुपयांचा निधी🌟 

परभणी : परभणी पाथरी येथील श्री.साईबाबा जन्मभूमी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या कामांकरीता महाराष्ट्र राज्य सरकारने मंगळवार दि.१३ फेब्रुवारी २०२४ रोजी ५० कोटी रुपयांचा निधी परभणी जिल्हा प्रशासनास वितरीत केला आहे. 

श्री साईबाबा यांच्या जन्मभूमीत म्हणजे पाथरीत तीर्थक्षेत्र विकास आराखडा करिता राज्य सरकारने ३० नोव्हेंबर २०२३ रोजी मंजुरी बहाल केली.त्यासाठी ९१ कोटी ८० लाख ९४ हजार रुपयांच्या कामांना सुद्धा हिरवा कंदील दाखवण्यात आला होता. सन २०२३/२०२४ या आर्थिक वर्षात माहे डिसेंबर २०२३ च्या आधिवेशातील पुरवणी मागणी द्वारे तीर्थक्षेत्र विकास आराखडा योजनेच्या अंतर्गत विविध तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास उपलब्ध झालेल्या निधीमधून या आराखड्याकरिता परभणी जिल्हा प्रशासनास ५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला.

 या निधीतून जमीन अधिग्रहणावर ३९ कोटी ६ लाख ९५ हजार रुपये तसेच प्रशासकीय खर्च एकूण विकास कामांवर दहा कोटी ९३ लाख ०५ हजार रुपये असे एकूण ५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

दरम्यान २०२३/२०२४ या आर्थिक वर्षाकरिता मुख्य लेखाशीर्ष ५४५२,०२११-५३ मोठी बांधकामे अंतर्गत या कामांसाठी निधी वितरित करण्यात येत आहे अशी माहिती नियोजन विभागाचे उपसचिव मिलिंद कुलकर्णी यांनी म्हटले आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या