🌟पुर्णा तालुक्यात 'मराठा योध्दा' मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाकडून जागोजागी 'रास्ता रोको'......!


🌟मराठा आरक्षणा संदर्भात सरकारने काढलेल्या सगे/सोयरे अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर करण्याची मागणी🌟


पुर्णा (दि.१६ फेब्रुवारी) - महाराष्ट्र सरकारने काढलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणासह सगे/सोयरे अध्यादेशाचे विधानसभा अधिवेशनात ठराव घेऊन कायद्यात रुपांतर करण्यात यावे या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील सराटी अंतरवेली गावात मागील सहा दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले क्रांतिकारी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांना खंबीर पाठिंबा म्हणून आज शुक्रवार दि.१६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११-०० वाजेच्या सुमारास सकल मराठा समाजाच्या वतीने पुर्णा-झिरोफाटा-परभणी या राज्यमार्गावरील शहरातील टी पॉईंटसह एरंडेश्वर झिरो फाटा तसेच पुर्णा-नांदेड राज्यमार्गावरील गौर फाटा येथे तसेच चुडावा येथे पिंपळा भत्या येथे कावलगाव येथे देखील सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 


पुर्णा-झिरोफाटा-परभणी मार्गावरील झिरो टि पॉईंट परिसरात सकल मराठा समाजाच्या वतीने 'क्रांतिकारी मराठा योद्धा' मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ आज शुक्रवारी यावेळी सकाळी ११-०० वाजता तब्बल अर्धा ते पाऊण तास भव्य रास्ता रोको करण्यात आला यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र सरकारने काढलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणासह सगे/सोयरे अध्यादेशाचे विधानसभा अधिवेशनात ठराव घेऊन कायद्यात रुपांतर करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली यावेळी सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने पुर्णा तहसिलचे तहसीलदार बोथीकर यांना निवेदन देण्यात आले यावेळी साहेबराव कल्याणकर,कपील किरडे,हारीभाऊ कदम,संजय कदम,गोपी ईगोले पवन बोबडे,गणपत कदम,रमाकांत कऱ्हाळे,गणेश बूचाले,सुंदर भोसले,सतीश सातपुते,शरद कदम आदीसह असंख्य मराठा समाज बांधवांची उपस्थिती होती..... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या