🌟मराठी भाषेचे वैभव टिकवण्यासाठी वाचन लेखन संस्कृती जोपासली पाहिजे - डॉ.संजय कसाब


🌟स्वा.सै.सूर्यभानजी पवार महाविद्यालयात कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते🌟

पूर्णा (दि.२८ फेब्रुवारी) -  मराठी भाषेचे वैभव टिकविण्यासाठी समाजात वाचन व लेखन संस्कृती मोठ्या प्रमाणात जोपासणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्राध्यापक डॉ. संजय कसाब यांनी केले ते स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरवदिन म्हणून साजरा करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

 शाळा ,महाविद्यालय  आणि विविध सामाजिक उपक्रमात चांगल्या दर्जेदार ग्रंथाची देवाण-घेवाण करणे , ग्रंथाचे वाचन करणे असी संस्कृती निर्माण करणे मराठी भाषेच्या विकासासाठी काळाची गरज असल्याचेही त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले याप्रसंगी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जीवनावरही त्यांनी भाष्य केले.

 या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार हे होते तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल डॉ. विलास काळे यांनी केले. याप्रसंगी विचारमंचावर गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. भीमराव मानकरे ,मराठी विभागाचे डॉ. मारुती भोसले उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास विभागाचे समन्वयक प्राध्यापक डॉ. प्रकाश सूर्यवंशी यांनी केले तर आभार डॉ. अशोक कोलंबेकर यांनी मानले या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक ,कर्मचारी व विद्यार्थी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या