🌟परभणी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन....!


🌟असे आवाहन सहायक आयुक्त श्रीमती गीता गुट्टे यांनी केले🌟

परभणी (दि.01 फेब्रुवारी) : शैक्षणिक वर्ष सन 2023-24 मधील प्रवेशित व भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजनेसाठी पात्र अनु.जाती, विजाभज, इमाव, तसेच विमाप्र प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महाडिबीटी प्रणाली 10 ऑक्टोबर, 2023 पासुन सुरु झाली असुन ऑनलाईन प्रणालीवर अर्ज नोंदणी व अर्जाची पडताळणी करुन समाज कल्याण कार्यालयाच्या लॉगिनवर पाठविण्याबाबत संबंधित विद्यार्थी व महाविद्यालयांनी कार्यवाही करण्याबाबत सुचना सर्व महाविद्यालय यांना दिलेल्या आहेत.

त्यानुषंगाने वेळापत्रकानुसार महाविद्यालयांनी कार्यवाही करण्यात यावी. सर्व पात्र असलेल्या अनु.जाती, विजाभज, इमाव तसेच विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी तात्काळ अर्ज नोंदणी करण्यात यावी. ऑनलाईन प्रणालीवर प्राप्त झालेल्या अर्जावर नमुद दिनांकापर्यंत महाविद्यालयांनी कार्यवाही करण्याबाबत आवाहन सहायक आयुक्त श्रीमती गीता गुट्टे यांनी केले आहे......

****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या