🌟स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदुस्थानची विकासस्वप्ने पाहणारे वादातीत द्रष्टा विकासपुरुष नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट......!


🌟नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात यावे - मिलिंदकुमार सोनार

नाशिक (प्रतिनिधी) - स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदुस्थानची विकासस्वप्ने पाहणारे, वादातीत द्रष्टा विकासपुरुष नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट यांना मरणोत्तर 'भारतरत्न' या स्वतंत्र भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविण्यात यावे. नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट यांना या पुरस्काराने गौरविले गेल्यास नाना शंकरशेट नव्हे, तर भारतरत्न या पुरस्काराचा खऱ्या अर्थाने गौरव होईल. नामदार जगन्नाथ नाना (शंकरशेट) यांना भारतरत्न भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेच पाहिजे, असे प्रतिपादन सकल भारतीय सोनार समाज संघटनेचे  संस्थापक मिलिंदकुमार सोनार यांनी केली आहे.  


भारतीय रेल्वेचे जनक, मुंबई महानगराचे शिल्पकार, स्वातंत्र्यपूर्व काळात नेटिव्ह गर्ल्स हायस्कूल ही  मुंबईत मुलींची पहिली शाळा सुरू करणारे, हिंदुस्थानातील व्यापार उदिम भरभराटीस यावा, यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात दळणवळण सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी तत्कालीन ब्रिटिश इंडियन गवर्नमेंटला प्रेरित करणारे, हिंदुस्थानातील जनमानसात या दळणवळण सुविधांची, रेल्वेविषयी जागृती करणारे, रेल्वे प्रवासातून तत्कालीन हिंदुस्थानातील रहिवाशांमध्ये जी स्पृश्य - अस्पृश्यतेने परिसीमा गाठली होती, ती काहीशी कमी करण्याचा प्रयत्न करणारे, नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट यांना 'भारतरत्न' या पुरस्काराने मरणोत्तर का होईना, गौरविले गेलेच पाहिजे.

तसेच मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला नामदार जगन्नाथ नाना शंकरशेट रेल्वे टर्मिनस मुंबई सेंट्रल असे नाव देण्याची जी मागणी प्रलंबित आहे, तीदेखील लवकरात लवकर पूर्ण झालीच पाहिजे, तसेच संपूर्ण भारतात जेथे जेथे रेल्वे टर्मिनस आहे, तेथे तेथे भारतीय रेल्वेचे जनक नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट यांचे तैलचित्र लावण्यात यावे, अशी मागणीदेखील सकल भारतीय सोनार समाज संघटन तर्फे करण्यात आली आहे.

भारताच्या अमृतमहोत्सवी वर्षात वरील तिन्ही मागण्या पूर्ण पूर्ण झाल्यास मरणोत्तर का होईना नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट यांचा यथोचित सन्मान झाला असे म्हणता येईल. केवळ आशिया खंडातच नव्हे तर संपूर्ण जगात बलशाली लोकशाही राष्ट्र असलेल्या भारतास ते भूषणावह ठरेल. या तिन्ही मागण्या करण्याची गरजच निर्माण व्हायला नको होती, याची दक्षता गतकालीन तसेच वर्तमान भारत सरकारने घ्यायला हवी होती अशी खंतही वरील तिन्ही मागण्या करताना सकल भारतीय सोनार समाज संघटनेचे संस्थापक मिलिंदकुमार सोनार यांनी केली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या