🌟पुर्णा येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात संत रविदास यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी....!

🌟गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा.डॉ.मानकरे यांच्या हस्तें संत रविदास महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन🌟 

पूर्णा (दि.२४ फेब्रुवारी) - पुर्णा येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात मानव मुक्तीसाठी कार्य करणारे थोर संत रविदास महाराज यांची ६४७ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . महाविद्यालयातील गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा.डॉ.भीमराव मानकरे यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या वतीने संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी महाविद्यालयातील गृहविज्ञान विभाग प्रमुख तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा.डॉ.सुरेखा भोसले,प्रसिद्ध विभाग समन्वयक प्रा.डॉ.संजय कसाब, विद्यार्थी विकास विभागाचे समन्वयक प्रा. डॉ.प्रकाश सूर्यवंशी,प्रा. डॉ.अशोक कोलंबीकर, प्रा.डॉ.शारदा बंडे, प्रा.वैशाली लोणे, प्रा.अनिता भोळे, कर्मचारी गिरधारी कदम तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक ,कर्मचारी व विद्यार्थी यांनी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. दीपमाला पाटोदे यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. प्रभाकर सूर्यवंशी यांनी मानले.या कार्यक्रमांसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या