🌟वाशिम येथे संत रविदास महाराज जयंती निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात २१ रक्तदात्यांचे एैच्छिक रक्तदान....!


🌟रक्तदान शिबीरात सुमारे २१ युवक व महिलांनी रक्तदान करुन समाजापुढे आदर्श घालून दिला🌟

फुलचंद भगत

वाशिम - चर्मकार समाजबांधव व मित्रमंडळाच्या आयोजनातून शनिवार, २४ फेब्रुवारी रोजी स्थानिक शुक्रवारपेठेतील कुंभार गल्लीमध्ये संत रविदास यांच्या ६४७ वी जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला. जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबीरात सुमारे २१ युवक व महिलांनी रक्तदान करुन समाजापुढे आदर्श घालून दिला.


जयंती कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी चर्मकार महासंघ युवा आघाडीचे शहराध्यक्ष अनिल घोले, प्रमुख पाहूणे म्हणून आकाश भाग्यवंत, पुरुषोत्तम तुपसांडे, अविनाश राजगुरु, तुळशिराम इंगळे, मुकेश पठाडे, प्रदीप इंगळे, रवि खंदारे, विष्णू गायकवाड, समाधान माने, डॉ. दीपक ढोके आदींची उपस्थिती होती. प्रारंभी अध्यक्ष व प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व संत रविदास यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. तदनंतर सर्वांनी जयंतीनिमित्त संत रविदास यांना अभिवादन केले. त्यानंतर आयोजित रक्तदान शिबीरात २१ युवक व महिलांनी उस्फूर्तपणे रक्तदान करुन रक्तदानाच्या राष्ट्रीय कार्यात आपला हातभार लावला. रक्त संकलनासाठी श्री गजानन रक्तपेढीचे प्रविण शेळके, अनंत सारुक, संजय शिंदे, मोहन गायकवाड आदींनी मदत केली. सुत्रसंचालन प्रदीप इंगळे तर उपस्थितांचे आभार सुनिल घोले यांनी मानले. कायर्र्क्रमाच्या यशस्वीतेसाठी चर्मकार समाजबांधव व मित्रमंडळींनी परिश्रम घेतले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या