🌟परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केली मतदान केंद्राची पाहणी....!


🌟लोकसभा मतदारसंघातील काही मतदान केंद्रांना दिली भेट : यात काही संवेदनशील मतदान केंद्रांचा देखील समावेश🌟


 
परभणी (दि.02 फेब्रुवारी) : आगामी काळात होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातील काही मतदान केंद्रांना भेट दिली त्यामध्ये काही संवेदनशील मतदान केंद्रांचा देखील समावेश होता. 

यावेळी प्रभारी पोलीस अधीक्षक यशवंत काळे,  उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे, स्वीय सहायक कैलास मठपती, नायब तहसीलदार सतीश रेड्डी, सुनिता वडवळकर, अव्वल कारकून दत्ता गिणगीने तसेच निवडणूक विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी मतदान केंद्राविषयी आवश्यक त्या सूचना दिल्या त्याचप्रमाणे मतदान केंद्रावर आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधांचा देखील आढावा घेऊन पाहणी केली.  तसेच ज्या सोयी सुविधा उपलब्ध नसतील त्या तसेच इतर बाबतीत येत्या पंधरा दिवसात मतदान केंद्र अद्यावत करून घेण्याबाबत सूचना दिल्या.

मतदान केंद्रावर उपस्थित असलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचा देखील मतदार यादी संबंधी धावता आढावा घेवून आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने नव मतदार नोंदणी अधिकाधिक करण्याबाबत त्याचप्रमाणे मतदार यादी अचूक करण्याबाबत सूचना दिल्या. तसेच मतदान केंद्रांचा आढावा झोनल अधिकारी यांच्यामार्फत घेण्याबाबत सूचना दिल्या.....

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या