🌟पुर्णेतील रेल्वे डिझेल घोटाळेबाजांची पोहोच भलतीच भारी ? म्हणे ज्याला वरिष्ठ तारी त्याला कायदा काय मारी ?🌟 रेल्वे डिझेल डेपो चोरी घोटाळ्यातील पडद्यामागील सुत्रधार कायद्याच्या कचाट्यात अडकणार तरी केव्हा ?🌟 


पुर्णा (दि.२७ फेब्रुवारी)
- नांदेड-पुर्णा-परभणी व नांदेड-पुर्णा-परळी या मार्गावरुन धावणाऱ्या प्रवासी/मालवाहतूक रेल्वे गाड्यांच्या डिझेल इंजिनला इंधन पुरवठा करणाऱ्या पुर्णा रेल्वे जंक्शन स्थानक परिसरातील डिझेल डेपोला मोठ्या प्रमाणात डिझेल पुरवठा करणाऱ्या डिझेल टँकर चालक/टँकर मालकांशी आर्थिक हितसंबंध जोपासत डिझेल घोटाळ्यांचे मुख्य केंद्रच बनवल्याची बाब उघडकीस आणण्याची मुख्य जवाबदारी रेल्वे सुरक्षा यंत्रणांची असतांना या गंभीर प्रकरणाकडे रेल्वे सुरक्षा यंत्रणांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले परंतु या डिझेल घोटाळेबाजांचे दुर्दैवच म्हणावें लागेल की दिलं २९ जानेवारी २०२४ रोजी म्हणजेच सदरील डिझेल डेपोचे खासगीकरण होण्याच्या अवघ्या नऊ दिवसांपूर्वीच पुर्णेतील रेल्वे डिझेल डेपोला डिझेल पुरवठा करण्यास आलेल्या व नियमाप्रमाणे संपूर्ण डिझेल टँकर खाली नकरता तब्बल जवळपास सहा हजार लिटर डिझेल चोरुन नेत असतांना परभणी जिल्हा पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हें शाखेच्या पथकाने दैठणा पोलीस स्थानकाच्या हद्दीतील सिंगणापूर फाटा परिसरातून सदरील डिझेल टँकर ज्याचा क्रमांक एम.एच.२१ बीएच ३९४४ हे ताब्यात घेऊन रेल्वे डिझेल घोटाळा उघडकीस आणण्याची ऐतिहासिक धाडसी कारवाई करून संपूर्ण दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागात खळबळ माजवली या डिझेल घोटाळ्याची जवाबदारी घेऊन रेल्वे डिझेल डेपोतील कार्यालय अधिक्षक माधवराव बलफेवाड जो पुर्वाश्रमीचा रेल्वे सुरक्षा बल कर्मचारी असल्याचे व डिकल अनफिट होऊन रेल्वे डिझेल डेपोत कार्यरत झाला असल्याचे समजते ज्यांच्या फेरतपासणीत याच रेल्वे डिझेल डेपोत कार्यरत कार्यालय अधीक्षक मोहम्मद इस्लाऊद्दीन उर्फ मोबीन याचे देखील नाव समोर आले ज्याने तपासयंत्रणांणा हुलकावणी देण्यासाठी केलेला अटकपूर्व जामिनाचा अर्ज जिल्हा व सत्र न्यायालय औरंगाबाद यांनी दि.१४ फेब्रुवारी २०२४ रोजी फेटाळल्यानंतर देखील तो अद्यापही तपासयंत्रणांच्या हाती लागलेला नाही तर याच रेल्वे डिझेल घोटाळ्यातील डिझेल टँकर मालक संतोष पवार व इंडियन ऑईल पेट्रोल पंप मॅनेजर रामचंद्र यादव यांना रेल्वे सुरक्षा बलाच्या तपासयंत्रणांणी दिल.१७ फेब्रुवारी २०२४ रोजी ताब्यात घेऊन सन्माननीय रेल्वे न्यायालय औरंगाबाद यांच्यासमोर हजर केले होते संबंधित दोन्ही आरोपींना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती यानंतर नेमकं काय झाले ते रेल्वे सुरक्षा यंत्रणांनाच माहीत ? यांतील आणखी महत्त्वाचा एक आरोपी कार्यालय अधीक्षक मोहम्मद इस्लाऊद्दीन उर्फ मोबीन अद्यापही तपास यंत्रणांच्या हातावर तुरी देऊन पसार आहे की जाणीवपूर्वक पसार केला गेला ? या उत्तर गुलदस्त्यातच आहे.


दरम्यान या प्रकरणातील तपासाचा आढावा घेण्यासाठी दि.१८ फेब्रुवारी २०२४ रोजी ११-३० वाजेच्या सुमारास रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलीस महानिरीक्षक आरोमासिंह ठाकूर यांनी पुर्णा जंक्शन स्थानक परिसरातील डिझेल डेपोला भेट दिली यावेळी त्यांनी स्थानिक पत्रकारांनी संवाद देखील साधला यावेळी बोलतांना त्यांनी पुर्णा रेल्वे जंक्शन स्थानक परिसरातील रेल्वे डिझेल डेपो प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नाही असे सांगितले यावेळी पत्रकारांनी आपण यातील आरोपीतांच्या मालमत्तेची चौकशी करणार काय ? असा प्रश्न उपस्थित केला असता मालमत्तेची चौकशी करणार असे आश्वासन देखील दिले परंतु सदरील रेल्वे डिझेल घोटाळ्याची सखोल चौकशी व्हावी या दृष्टीने तपास सीबीआय किंवा प्रवर्तन निर्दशालयाकडे वर्ग करणार काय ? असा प्रश्न उपस्थित करताच या रेल्वे डिझेल घोटाळ्याचे स्वरूप दि.२९ जानेवारी २०२४ केवळ या एक दिवसाचे ठरवून मागील काळात झालेल्या घोटाळ्यांवरील पडदा उठणार नसल्याचे यावेळी दाखवून दिल्याने त्यांची भुमिका यावेळी संशयास्पद असल्याचे निदर्शनास आले दरम्यान रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलीस महानिरीक्षक आरोमासिंह ठाकूर या पत्रकारांशी संवाद साधत असतांना ज्यांचा पत्रकारीतेशी यत्किंचितही संबंध नाही कसे घोटाळेबाजांचे मुखबीर देखील या ठिकाणी पत्रकारीतेचा मुखवटा घालून संपूर्ण परिस्थितीवर लक्ष केंद्रित करीत प्रश्नांचा भडीमार करणाऱ्या पत्रकारांचे चित्रिकरण करतांना अनेकांनी बघीतले दरम्यान सदरील रेल्वे डिझेल घोटाळ्याचा तपास अत्यंत कासवगतीने होत असल्याने या रेल्वे डिझेल घोटाळ्यावर सोईस्कर रित्या पांघरूण घालण्याचे काम तर केल्या जात नाही ना ? असा प्रश्न उपस्थित होत असून दिलं.०७ फेब्रुवारी २०२४ रोजी पुर्णा जंक्शन स्थानक परिसरातील रेल्वे डिझेल डेपोचे खासगीकरण झाल्याने आता डिझेल घोटाळ्याला पुन्हा रानमोकळे होते की काय ? असा प्रश्न ही आता गंभीर स्वरूप धारण करीत आहे.....

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या