🌟पोस्टरबाजी टाळुन समाजातील गरजू व्यक्तींना सरळ मदत - समीर दुधगांवकर


🌟परभणीत समीर दुधगांवकर यांचा दिशादर्शक प्रयोग सूरू : जिल्ह्यातील राजकारण्यांनी देखील धडा घेण्याची आवश्यकता🌟


परभणी (दि.12 फेब्रुवारी) - परभणी जिल्ह्यातील धाडसी सुशिक्षित युवा नेतृत्व समीर दुधगांवकर यांचा दिशादर्शक प्रयोग परभणीत सूरू...बॅनरबाजीचा अतिरेक शहरात खूप वाढला आहे. पोस्टर बाजीची अतिशयोक्ती, पर्यावरणाचा ऱ्हासाचा धोका, अपघात वाढ आदी समाज विघातक गोष्टी बॅनरबाजी मुळे होतात. ह्याची जाण ठेवुन अनावश्यक खर्चाला फाटा देऊन गरिबांना सरळ मदत करण्याचा उपक्रम राबविला जात आहे. भंपक बॅनरबाजी, पोस्टर्स, जाहिराती यावर अमाप खर्च करून गरिबांकडे, विकासाकडे दुर्लक्ष करणार्यांना यामुळे चपराक बसणार आहे. जनतेची दिशाभूल करणाऱ्या भंपक लोकांना यातुन संदेश मिळावा ही अपेक्षा.. 

अल्पवाधितच "टीम समीर दुधगांवकर" गरजूपर्यंत मदत पोचवत आहेत. गरजुंनी मिशन 16-123 हा फॉर्म भरुन दिल्यानंतर त्यांना बोलावुन घेऊन मदत देण्यात येणार आहे.  दुधगांवकर संपर्क कार्यालय, जुनी जिल्हा परिषद जिंतूर रोड, परभणी येथे फॉर्म उपलब्ध आहेत. सदर फॉर्म भरून गरजू जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन समीर दुधगांवकर यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या