🌟जंग-ए-अजित न्युज - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स/ बातम्या.....!


🌟राजीनामा देऊन उपकार केले का ? मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर हल्लाबोल🌟

* शेवटची निवडणूक आहे असं भावनिक आवाहन केलं जाईल,पण कधी शेवटची निवडणूक असेल काय माहीत ? अजित पवारांची नाव न घेता शरद पवारांवर टीका

* चुलत्याच्या मरणाची वाट पाहतोय अजित पवारांनी हद्द केली, लाज वाटते तुमच्यासोबत काम केल्याची ; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर निशाणा

* पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करणारे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या अडचणीत वाढ,गणपत गायकवाडांसह सात जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल जमीन मालकाला जातीवाचक शब्द वापरल्यानं गुन्हा

* नारायण राणे आणि दिपक केसरकरांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंच्या सभा भाषणावेळी उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल, आमचे दिवस येतील तेव्हा हे सर्व व्याजसह पूर्ण फेडू उद्धव  ठाकरेंचा इशारा

* राजीनामा देऊन उपकार केले का ? मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर हल्लाबोल देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना बदनाम करण्याचं काम भुजबळ करत आहेत,मनोज जरांगेंचा आरोप ; नाना पटोलेंची भुजबळांवर खोचक टीका ; म्हणाले सगळी नौटंकी राजीनामा दिला सांगायचं मात्र स्वतःच कॅबिनेटमध्ये जायचं

* गुन्हेगारीत महाराष्ट्रानं बिहारला मागे टाकलं, जयंत पाटलांचा राज्य सरकारवर निशाणा

* काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचा उमेदवार, वर्धा लोकसभेकरता राष्ट्रवादीच्या हर्षवर्धन देशमुखांना कामाला लागण्याचे आदेश

* विधानसभेच्या वाटाघाटी झाल्या तरच लोकसभेला आम्ही भाजप सोबत राहू,आमदार बच्चू कडूंचा भाजपला इशारा

* अभिनेत्री पूनम पांडेला मरणाचं सोंग महागात पडणार, खोटं नाटक केल्याबद्दल मुंबईत गुन्हा दाखल, अटक करण्याची मागणी

* तिसरा दिवस संपला, इंग्लंडला विजयासाठी 332 धावांची गरज; भारताची बुमराहवर मोठी मदार ; 'प्रिन्स'चं दमदार कमबॅक! शतकी खेळीसह शुभमन गिलचं टीकाकारांना तळपत्या बॅटने उत्तर, 147 धावांमध्ये 104 धावांची खेळी

* पंढरपूर काॅरीडाॅरच्या आराखड्याचे काम सुरू, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती*

* लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपचे मिशन अयोध्या, मुंबईकरांना घडवणार रामलल्लाचे मोफत दर्शन,उद्या पहिली विशेष रेल्वे रवाना होणार

* एकत्र निवडणुका घेण्याच्या मुद्द्यावर कोविंद समितीला राजकीय पक्षांकडून 35 निवेदने; CM शिंदेंचेही समर्थन

* बंद घरात 3 फळविक्रेत्यांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने एकच खळबळ; पालघर जिल्ह्यात खळबळ

* मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धावत्या कंटेनरला अचानक आग; आगीत संपूर्ण कंटेनर जळून खाक झालं...

✍️ *मोहन चौकेकर*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या