🪯नांदेड तख्त सचखंड गुरुद्वाऱ्यावर सरकारने लादलेल्या नवीन कायद्या विरोधातील साखळी उपोषणाचा आज २१ वा दिवस...!


 🪯महाराष्ट्र सरकारसह जिल्हा प्रशासनही खेळतय हुजूरी सिख समुदायाच्या भावनांशी खेळ ? 🪯

 🪯नवीन कायद्याला स्थगिती देण्याच्ये उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे केवळ ट्युटर अकाऊंटवर ट्युवीट : जीआर अद्याप नाही 🪯  

 🪯हुजूरी सिख समुदाय संभ्रमावस्थेत : प्रशासन सिख समुदायाच्या भावनांची दखल घेण्यास तयार नाही हक्काच्या लढ्याला २१ व्या दिवस 🪯 

नांदेड (दि.२८ फेब्रुवारी) - सिख समुदायाची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व पाच पवित्र तख्तांपैकी एक सर्वोच्च तख्त असलेल्या पवित्र तख्त सचखंड हुजूर साहीब या पवित्र तिर्थक्षेत्रावर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने सन २०१६ यावर्षी गुरुद्वाऱा ॲक्ट १९५६ या कायद्यातील कलम ११ मध्ये मनमानी पद्धतीने संशोधन करून तख्त सचखंड गुरुद्वारा बोर्डावर अध्यक्ष निवडण्याचा हुजूरी सिख समुदायाचा मुलभूत धार्मिक अधिकार हिरावून घेतला यावरही सरकारचे समाधान झाले नाही हुजूरी सिख समुदायाकडून मागील आठ वर्षांपासून सातत्याने कलम ११ मधील संशोधनाला सातत्याने प्रचंड विरोध होत असतांना देखील महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दि.०५ फेब्रुवारी २०२४ रोजी झालेल्या झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सिख धर्मियांसह गुरसिखीवर अपार श्रद्धा असणाऱ्यांची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदेड येथील पवित्र तख्त सचखंड गुरुद्वाऱ्यावर गुरुद्वाऱा अधिनियम-२०२४ हा कायदा लादण्याची खेळी खेळल्याचे कृत्य केले सरकारच्या या बेबंदशाही धोरणा विरोधात मागील २१ दिवसापासून हुजूरी सिख बांधव आंदोलन करत असतांना मात्र नांदेड जिल्हा प्रशासनाकडून या साखळी उपोषण आंदोलनाकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत असल्याने प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. आज गुरुवार दि.२९ फेब्रुवारी २०२४ रोजी या साखळी उपोषण आंदोलनाच्या एकविसाव्या दिवशी देखील राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन गुरुद्वारा अधिनियम-२०२४ या कायद्याला स्थगिती दिल्या संदर्भातील आपल्या ट्युटर अकाऊंटवर दि.१४ फेब्रुवारी २०२४ रोजी केलेल्या ट्युवीटचा हवाला देऊन हुजूरी सिख समुदायाकडून गुरुद्वाऱा अधिनियम-२०२४ या कायद्या विरोधात मागील २१ दिवसांपासून सुरु करण्यात आलेल्या साखळी उपोषण आंदोलनकर्त्यांना आंदोलन स्थगित करण्या संदर्भात सांगून त्यांची दिशाभूल केली जात आहे परंतु संबंधित नवीन कायद्याला स्थगिती देण्यात आल्याबद्दलचा अधिकृत जीआर मात्र अद्यापही जारी करण्यात आलेला नसल्यामुळे आज २१ व्या दिवशी देखील साखळी उपोषण आंदोलन सुरुच असून आज गुरुवार दि.२९ फेब्रुवारी रोजी साखळी उपोषणास स.जसबीरसिंघ बुंगई,स.मनबीसिंघ ग्रंथी,स.जगजीतसिंघ खालसा,स.प्रेमजीतसिंघ शिलेदार,स.गुरुदेवसिंघ रामगडीया आदी हुजूरी सिख बांधव बसले असून त्यांना स.रवींद्रसिंघ बुंगई,स.मनजीतसिंघ करिमनगरवाले, स.भोलासिंघ गाडिवाले स.दिपकसिंघ हजुरीया,स.बिरेदरसिंघ बेदी,स.जगदीपसिंघ सिंघ नंबरदार,स.बलजीतसिंघ बावरी,स.मनप्रितसिंघ कारागीर,स.प्रेमज्योतसिंघ सुखई, स.बलवंतसिंघ संधु,स.बक्षीसिंघ पुजारी यांनी पाठिंबा देऊन या साखळी उपोषण आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला आहे.

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारने सचखंड गुरुद्वाऱ्यावर लादलेल्या नवीन कायद्या विरोधात मागील २१ दिवसांपासून पासून साखळी उपोषण आंदोलन करणाऱ्या हुजूरी सिख समुदायाच्या भावनांशी महाराष्ट्र सरकारसह जिल्हा प्रशासनही खेळतय की काय ? असा संतप्त सवाल सिख समुदायात उपस्थित होत असून राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दि.१४ फेब्रुवारी रोजी आपल्या ट्युटर अकाऊंटवर ट्युवीट करुन पंधरा दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर देखील सरकारच्या वतीने अधिकृत जीआर काढण्यात आला नाही असा प्रश्न हुजूरी सिख समाजासह आंदोलनकर्त्यांमध्ये उपस्थित होत असून प्रशासन वेळकाढूपणाचे धोरण राबवत असल्याचे यावरून स्पष्ट होत असून प्रशासनाकडून जोपर्यंत गुरुद्वाऱा अधिनियम-२०२४ या नवीन कायद्याला स्थगिती दिल्याचा अध्यादेश अर्थात जीआर जोपर्यंत हुजूरी सिख समुदायासह आंदोलनकर्त्यांना प्राप्त होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची घोषणा आंदोलनकर्त्या हुजूरी सिख बांधवांनी केली आहे.......
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या