🌟पुर्णेतील सेवानिवृत्त एअर फोर्स ऑफिसर श्री.गंगाधर रानडे यांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार......!


🌟यावेळी सेवानिवृत्त एअर फोर्स ऑफिसर श्री.रानडे यांनी मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शक🌟


पुर्णा (दि.२७ फेब्रुवारी) - पुर्णा येथील एअर फोर्स सार्जंट या हुद्यावरील इंजिनिअर असलेले सेवा निवृत्त श्री.गंगाधर आत्माराम रानडे यांनी 17 वर्षाची सेवा बजावली असून 1965 चे युद्ध 1972 च्या युद्धात त्यांचा सक्रिय सहभाग होता आज मंगळवार दि.27 फेब्रुवारी 2024 रोजी एअर फोर्स ऑफिसर श्री.गंगाधर रानडे यांनी मेजर मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स अकॅडमीच्या सर्व विद्यार्थ्यांना एअर फोर्स संबंधी व अभ्यास व ग्राउंड संबंधी शारीरिक क्षमता विषयी त्यांनी मार्गदर्शन केले असून नुकतेच संपन्न झालेल्या दि.18 फेब्रुवारी 2024 रोजी अहमदाबाद गुजरात येथे अथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे घेण्यात आलेल्या जुनिअर राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स अकॅडमीचे विद्यार्थी 16 वर्षा आतील मुले 1) सय्यद शिबानं 600मी धावणे.2) सार्थक साळवे ट्राथलॉन (60मी, 600मी धावणे, लॉन्ग जंप, भालाफेक ) ई क्रीडा प्रकारात सहभाग नोंदवाला असून जिल्हा स्तरीय मैदानी स्पर्धेत विजयी होऊन नुकतेच संपन्न झालेली सांगली मिरज येथे महाराष्ट्र अथलेटीक्स असोसिएशन तर्फे घेण्यात आलेल्या जुनिअर राज्य स्तरीय मैदानी स्पर्धेत 8/10/12 वर्षा आतील मुले व मुली मध्ये मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स अकॅडमीचे विद्यार्थी 1) सय्यद फैजान 60 मी,300 मी धावणे 2) श्लोक जाधव गोळा फेक 3) शिवम जाधव 60 मी धावणे, लॉन्ग जॅम्प 4) सरोजा जाधव 60 मी धावणे, शॉटपुट 5) विशाखा कोमटवार 60 मी धावणे,100मी धावणे 6) ऋषभ सवंडकर लॉन्ग जंप 7) संजना गुंडे 60 मी आणि 600 मी धावणे ई विद्यार्थी जिल्हा स्पर्धेत प्रथम व द्वितीय येऊन राज्य मैदानी स्पर्धेस सहभाग नोंदविला आहे.पुणे येथे झालेल्या ज्युनिअर राज्य स्तरीय रग्बी स्पर्धेत 16 वर्षा खालील मुली मध्ये पद्मजा कोमटवार, संस्कृती पाचलगावकर आदिनी सहभाग नोंदवाला असून या सर्वांचा सत्कार श्री. गंगाधर रानडे यांच्या हस्ते करण्यात आला असून या प्रसंगी उपस्तित जेष्ठ क्रीडा शिक्षक श्री.अनिल उकरंडे,श्री अतुल शहाणे, स्वराज अकॅडमीचे संचालक प्रा. ज्ञानेश्वर बोकारे आदी उपस्तित होते. या सर्व विद्यार्थ्यांना मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स अकॅडमीचे संचालक डॉ महेश जाधव यांचे मार्गदर्शन लाभले......टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या