🌟परभणी जिल्ह्यात भारतीय कापूस महामंडळामार्फत कापूस खरेदी केंद्र सुरू....!


🌟कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस आवश्यक त्या कागदपत्रांसह सीसीआयच्या नजिकच्या केंद्रांवर विक्री करावा🌟

परभणी (दि. 6 फेब्रुवारी) : कापूस पणन महासंघाच्या परभणी विभागातील कापूस उत्पादक शेतक-यांनी परभणी जिल्ह्यात सेलु, ताडकळस, मानवत, सोनपेठ, जिंतुर, बोरी तर हिंगोली जिल्ह्यात जवळा बाजार व वसमत नगर अशा एकूण 8 कापूस खरेदी केंद्रांवर भारतीय कापूस महामंडळ (सी.सी.आय.) मार्फत एफ.ए.क्यु. प्रतिच्या कापसाची किमान हमी दराने कापूस खरेदी सुरु आहे.

 तसेच याव्यतिरीक्त सीसीआयमार्फत परभणी जिल्ह्यात परभणी, गंगाखेड, पाथरी, व हिंगोली जिल्ह्यात हिंगोली या 4 केंद्रांवर किमान हमी दराने कापूस खरेदी केंद्र उघडण्याची कार्यवाही सुरु आहे. तरी सर्व कापूस उत्पादक शेतक-यांनी आपला कापूस आवश्यक त्या कागदपत्रांसह सीसीआयच्या नजिकच्या केंद्रांवर विक्री करण्याचे आवाहन प्र. विभागीय व्यवस्थापक बि.व्ही. जाधव यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या