🌟पुर्णेतील रेल्वे डिझेल चोरी प्रकरणातील कार्यालय अधिक्षकाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला...!


🌟रेल्वे डिझेल चोरी प्रकरणाचा तपास सीबीआयकडे जाणाची वर्तवली जात आहे शक्यता ?🌟

पुर्णा (विशेष वृत्त) दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागांतर्गत धावणाऱ्या रेल्वे मालवाहतूक व प्रवासी वाहतूक करणाऱ्या एक्सप्रेस/पॅसेंजर गाड्यांच्या डिझेल इंजिनला इंधन पुरवठा पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकावरील डिझेल डेपोतून केला जातो नांदेड-पुर्णा-परभणी या लोहमार्गावरुन प्रतीरोज जवळपास पस्तीस ते चाळीस रेल्वे गाड्या धावतात डिझेल डेपोसह फिलिंग पॉईंट पुर्णा स्थानकावर असल्यामुळे येथे टॅंकरद्वारे हजारो लिटर डिझेलचा पुरवठा होतो मात्र मागील अनेक वर्षांपासून या डिझेल डेपोतून मोठ्या प्रमाणात डिझेलचा काळाबाजार होत असल्याची चर्चा होत असतांनाच मागील महिन्यात दि.२९ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १२-०० वाजेच्या सुमारास परभणी-गंगाखेड-ताडकळस राज्यमार्गावरील सिंगणापूर फाट्यालगत परभणी जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रेल्वेला डिझेल पुरवठा करणारा टॅंकर क्रमांक एम.एच.२१ बीएच ३९४४ हा टॅंकर ड्रायव्हर संदिप आनंदराव पांढरे राहणार माळसिरस जिल्हा सोलापूर याच्यासह रंगेहाथ ताब्यात घेऊन डिझेल अफरातफर घटनेला एकप्रकारे दुजोराच दिल्याचे उघड झाले.

पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकावरील डिझेल अफरातफर अर्थात चोरी प्रकरणाचा तपास करणाऱ्या तपास यंत्रणांनी या टॅंकर ड्रायव्हर संदिप आनंदराव पांढरे यांच्या जाबजवाबावरून या प्रकरणात माधवराव बलफेवाड कार्यालयीन अधिक्षक डिझेल डेपो पुर्णा, संतोष पवार डिझेल टॅंकर मालक राहणार वाटूर फाटा जिल्हा जालना,मोहम्मद इस्लआऊद्दईन उर्फ मोबीन मुख्य कार्यालय अधीक्षक रेल्वे कन्सुंमर डिझेल डेपो पुर्णा यांच्यावर रितसर गुन्हा दाखल केला होता या प्रकरणात फरार असलेला आरोपी मोहम्मद इस्लआऊद्दईन उर्फ मोबीन याने Case No.CRI Bail Appln./0000273/2024 द्वारे अटकपूर्व जामीन मिळावा याकरिता माननीय जिल्हा सत्र न्यायालय औरंगाबाद यांच्याकडे अर्ज दाखल केला होता या संदर्भात न्यायालयाने काल आरोपी व फिर्यादी पक्षाची बाजू तपासून दि.१४ फेब्रुवारी २०२४ रोजी आरोपी मोहम्मद इस्लाऊद्दीन उर्फ मोबीन याचा जामीन अर्ज फेटाळून लावला असून या प्रकरणात सरकारी वकील राजू पहाडीया यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली असून या प्रकरणाचा तपास रेल्वे सुरक्षा बलाचे पो.नि.श्री.अरविंद कुमार शर्मा,पो.नि.श्री रवी बाबू,स.फौजदार श्री शेख जावेद हे करीत आहेत.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या