🌟पुर्णा तालुक्यात बेलगाम झालेल्या अवैध वाळू तस्कर माफियाशाही विरोधात महसूल प्रशासनाकडून धडक कारवाईला सुरुवात....!


🌟नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दोन दिवसात घेतली अवैध वाळूची ०९ वाहनं ताब्यात🌟 

पुर्णा (दि.११ फेब्रुवारी) - पुर्णा-गोदावरी नदीपात्र आपल्या बापाची खाजगी मालमत्ता असल्यागत दिवसरात्र जेसीबी यंत्रासह विविध यंत्रासह अंतराज्यातील असंख्य गोताखोर कामगारांच्या साहाय्याने  अक्षरशः रात्रंदिवस नदीपात्रांना खरडून काढणाऱ्या आणि भ्रष्ट बेईमान नौकरशहांच्या आर्थिक हितसंबंधा आधारें 'सैय्या भये कोतवाल तो अब डर काहें का ?' या आवेशात प्रचंड प्रमाणात चोरट्या वाळूसह शासकीय गौण खनिजाची असंख्य वाहनांतून तस्करी करणाऱ्या तस्कर माफियाशाही विरोधात महसूल प्रशासनातील अधिकारी तथा नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बेधडक धाडसी कारवाईला सुरुवात केल्याने अवैध वाळू तस्कर माफियाशाहीची भागमभाग सुरू झाल्याचे पहिल्यांदाच पहावयास मिळत असून महसूल प्रशासनाने मागील छत्तीस तासांच्या आत तब्बल ०९ अवैध चोरट्या गौण खनिज वाळूची वाहनं ताब्यात घेतली आहेत.


पुर्णेतील महसूल प्रशासनाकडून शुक्रवार दि.०९ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ०६-३० ते ०७-०० वाजेच्या सुमारास तालुक्यातील  लक्ष्मीनगर/सुकी पिंपळगाव येथील पुर्णा नदीपात्रातून बेकायदेशीर उत्खनन करुन चोरट्या वाळूची वाहतूक करणारी तब्बल सात टिप्पर ताब्यात घेण्याच्या कारवाईला छत्तीस तासांचा कालावधी उलटत नाही तत्पूर्वीच महसूल प्रशासनाचे अधिकारी तथा नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांच्या नेतृत्वाखालील पथकातील शेलाटे,मंडळ अधिकारी खाडे,अनुप सावरकर यांनी आज रविवार दि.११ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री ०३-०० ते ०३-३० वाजेच्या सुमारास चोरट्या वाळूची वाहतूक करणारी ०२ टिप्पर तालूक्यातील मौजे कान्हेगाव येथून ताब्यात घेतली असून यात एका टिप्परचा क्र.एम.एच.१४ एएच ६९०२ दुसऱ्या टिप्परचा क्र.एम.एच.०४ इएल ६८८५ असा असून पथकाने दोन्ही वाहनं ताब्यात घेऊन तहसिल कार्यालय पुर्णा येथे रितसर कारवाई पुर्ण करुन जमा केलेली आहेत महसूल प्रशासनातील नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांनी अवैध वाळू तस्कर माफियाशाही विरोधात सुरू केलेल्या या बेधडक कारवाई मुळे अवैध वाळू तस्कर माफियांमध्ये अक्षरशः भागमभाग सुरू झाल्याचे निदर्शनास येत आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या