🌟मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथे महिलांच्यावतीने आनंद मेळावा संपन्न....!


🌟महिलांच्या कलागुणांनासह त्यांच्या कार्याला प्रोत्साहन मिळावे याकरिता मेळाव्याचे आयोजन🌟 

फुलचंद भगत

वाशिम :- मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील महिलांनी दुसऱ्यांदा सतीआई नगरीमध्ये भव्य महिला मेळाव्याचे आयोजन २३ फेब्रुवारी रोज शुक्रवारी साई मंदिर  येथे केले होते महिलांच्या कलागुणांना वाव मिळवा,महिलांच्या कार्याला प्रोत्साहन मिळावे ग्रामीण भागातील महिलांना तसेच व्यवसाय करण्याचे पाठबळ मिळावे यासाठी मेळाव्याचे आयोजन शेलुबाज़ार नगरीत करण्यात आले.

 या मेळाव्यामध्ये वेगवेगळे ४० स्टॉल लावण्यात आले होते. महिलांनी हाताने तयार केलेल्या वस्तु, विविध मालाची दुकान, महिलांनी स्वतः तयार केलेल्या खादयपदार्थाची दुकाने अशा विविध स्टॉलची उभारणी या मेळ्याव्यामध्ये करण्यात आली. २३ फेब्रुवारी शुक्रवारी रोजी भव्य महिला मेळाव्याचे उद्घाटन प्रिया विक्की गुप्ता, किरण अग्रवाल,मिताली गुप्ता, भावना बोबडे,रजनी गुप्ता,दुर्गा दुगाने,पुनम गुप्ता यांच्या हस्ते संपन्न झाले. तर स्टॉलची सुरुवात सौ. प्रमिलाताई पवार यांच्या रस्ते नारक फाडुन झाले.या मेळाव्याच्या दरम्यान लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले होते. या लकी ड्रॉ मध्ये पहीला क्रमांक सुनिता भागवत लाठी,दुसरा आराध्या गुप्ता शेलुबाजार,तिसरा क्रमांक सृष्टी भोसले शेलुबाजार यांनी मिळवला.हा मेळावा सायंकाळी ७ वाजेपर्यंत चालला. परिसरातील सर्व महिला मंडळीनी या महिला आनंद मेळाव्याचा लाभ घेतला. हा महिला मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रिया गुप्ता, मिताली गुप्ता, किरण अग्रवाल, भावना बोबडे,दुर्गा दुगाने, पुनम गुप्ता,व इतर महिलांनी अथक परिश्रम घेतले.तसेच आनंद महिला मेळावा मध्ये सहभागी झालेल्या महिलांचे आई जगानी आभार व्यक्त केले.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.8459273206

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या