🌟जिल्ह्यात कोणीही येवो विजय आपलाच : खासदार संजय जाधव यांचे पदाधिकारी व कार्यकर्ता संवाद मेळाव्यात प्रतिपादन🌟
परभणी (दि.१३ फेब्रुवारी) : आगामी लोकसभा निवडणूकीत परभणी लोकसभा मतदारसंघाच्या रिंगणात कोणीही येवो विजय आपलाच आहे असा दावा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परभणी येथील पाथरी रस्त्यावरील राजलक्ष्मी लॉन्स येथे आज मंगळवार दि.१३ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारच्या सुमारास आयोजित आजी/माजी पक्ष पदाधिकारी/कार्यकर्ता मेळाव्यात केला.
या बाबत सविस्तर वृत्त असे की आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) गटाने जिल्ह्यात रणनीती आखण्यास सुरुवात केली असून त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना (उबाठा) गटाचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी शहरातील पाथरी रस्त्यावरील 'राजलक्ष्मी लॉन्स' येथे आज मंगळवारी दुपारी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित केला होता यावेळी जिल्हा प्रमुख विशाल कदम,सुरेश ढगे,अर्जून सामाले, सखूबाई लटपटे, साधना राठोड, राम खराबे, गंगाप्रसाद आनेराव, बाळासाहेब राखे,मारोती बनसोडे,संजय सारणीकर,नंदू आवचार यांच्यासह अन्य पदाधिकारी/कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी खासदार संजय जाधव यांनी भारतीय जनता पार्टीवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला यावेळी बोलतांना खा.जाधव म्हणाले भारतीय जनता पार्टीकडून विरोधकांच्या होणाऱ्या मुस्कटदाबीच्या या धोरणाविरोधात दंड थोपाटून उभे राहण्याची ताकद केवळ शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यात आहे. त्यामुळे सर्व पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी आतापासूनच भाजप विरोधातील या सर्व लढाईत सामूहीकपणे पूर्ण ताकदिनिशी उतरले पाहिजे व सत्तारुढ पक्षाचे हे धोरण हाणून पाडले पाहिजे असे देखील खासदार जाधव म्हणाले गेल्या काही वर्षांपासून ते आजतागायतपर्यंत ठाकरे व शिवसेने विरोधात भाजपाचे हे धोरण म्हणजेच भितीपोटीचा प्रकार आहे अशी टिकाही जाधव यांनी केली.
गेल्या काही महिन्यांपासून भारतीय जनता पक्षात मोठ्या प्रमाणावर इतर पक्षांतील नेतेमंडळींची आयात केली जात असून त्यामुळे भारतीय जनता पार्टीतील निष्ठावंतावर मोठा अन्याय होत आहे असेही स्पष्ट करीत जाधव यांनी केवळ सतरंज्या उचलण्याचे काम आता भाजपातील निष्ठावंतांकडे उरले असल्याची खिल्लीही यावेळी खासदार जाधव यांनी उडवली दरम्यान शिवसैनिकांनी वाढत्या महागाईसह सर्वसामान्य नागरीकांच्या प्रश्नांवर सरकार विरोधात मोठा जोरदार आवाज उठविला पाहिजे नव्या उमेदीने उभे राहिले पाहिजे व आतापासूनच संभाव्य लढाईसाठी कंबर कसली पाहिजे असे आवाहन देखील खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी यावेळी केले........
0 टिप्पण्या