🌟पुर्णा तालुका भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने 'प्रबुद्ध भारत' या वर्तमानपत्राचा ६८ व्या वर्धापन दिन उत्साहात संपन्न....!


🌟यावेळी तालुकाध्यक्ष सुनील मगरे यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟


पुर्णा : पुर्णा तालुका भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने 'प्रबुद्ध भारत' या पाक्षिक वर्तमानपत्राचा ६८ वा वर्धापन दिन डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात रविवार दि.०३ फेब्रुवारी २०२४  रोजी तालुकाध्यक्ष सुनील मगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.  

वर्धापन दिनानिमित्त शहरातील बांधवांना 'प्रबुद्ध भारत' या पाक्षिकाचे अंक भेट देण्यात आले यावेळी सर्व नवनियुक्त तालुका शाखा पूर्णा येथील पदाधिकारी यांनी अंक चालू करण्याचे ठरवले. कार्यक्रमास तालुका पदाधिकारी राजाराम गायकवाड, केशव मकासरे,आनंद गायकवाड इत्यादी पदाधिकारी यांनी उपस्थित असलेल्या सवांना संबोधित केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले तर  कार्यक्रमाचे अधाक्ष तथा भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष मा. सुनील मगरे यांनी उपस्थित सर्व पदाधिकारी यांना शिस्तबध्द मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास समता सैनिक दलाचे सैनिक  धीरज गायकवाड, प्रवीण काशीदे, भगवान जोंधळे,राहुल धबाले, संदेश खाडे, मनोज मुळे, ईश्वर वेडे, दिलीप हानवते, ढेंबरे इत्यादी सैनिक उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या