🌟दिव्यांग मुलां-मुलींच्या क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन....!


🌟क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतीक कार्यक्रमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न🌟


 
परभणी (दि.14 फेब्रुवारी) : क्रीडा स्पर्धामुळे विद्यार्थ्यांच्या अंगी जिद्द निर्माण होवून ते स्वावलंबी बनतात असे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांनी जिल्हा समाजकल्याण अधिकारी,जिल्हा परिषद परभणी व रेणूका शिक्षण प्रसारक मंडळ, परभणी यांच्या संयुक्त विद्यामाने स्वा.सै.कै.रामराव कान्हेकर मूकबधिर निवासी विद्यालय टाकळी (कुं.) येथे आयोजित जिल्हास्तरीय दिव्यांग मुलां-मुलींच्या क्रीडा स्पर्धेच्या क्रिडा स्पर्धा व सांस्कृतीक कार्यक्रमाच्या उद्घाटन करतांना म्हणाले.


यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव संतोष लांडगे, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. नागेश लखमावार,जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदिप घोणसीकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी गिता गुट्टे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहूल गीते, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विद्यासागर पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सुरवसे, रेणूका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. मिर्लोद कान्हेकर, महाराष्ट्र अपंग शिक्षण संस्थेचे संचालक निलेश पटेल, ज्ञानदिप शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीराम मुडे, सुरज कदम, रेणूका शि.प्र.मं.च्या कोषाध्यक्षा डॉ. मनिषा कान्हेकर, शैलेंद्र कान्हेकर, समाजकल्याण दिव्यांग विभागाचे प्रल्हाद लांडे उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा तसेच सर्वच विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे प्रत्येक खेळात भाग घतला पाहीजे असे प्रतिपादन श्रीमती गुट्टे यांनी प्रास्ताविकात केले. या प्रसंगी समाजकल्याण दिव्यांग विभागाचे प्रल्हाद लांडे यांनी अशा क्रीडा स्पर्धाच्या आयोजनामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडत असतात. तसेच विद्यार्थ्यांच्या संपूर्ण सहभागाने त्यांच्या अंगी उत्साह निर्माण होतो. तसेच मनस्वास्था बरोबर एकाग्रता वाढीस मदत होते असे मनोगत व्यक्त केले. दिव्यांगांच्या प्रकारानुसार विविध क्रीडा प्रकारात विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद देत भाग घेतला. 

सांस्कृतिक कार्यक्रमाला परीक्षक म्हणून डॉ. संध्या मानवतकर, डॉ. स्नेहल लाभशेटवार या होत्या. सांस्कृतीक कार्यक्रमात विविध कलाप्रकारचे  सादरीकरण झाले. यात सर्वच सहभागी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन माधव घायाळ व प्रकाश पेडगावकर यांनी केले तर सर्व उपस्थितांचे आभार समाजकल्याण दिव्यांग विभागाचे प्रल्हाद लांडे यांनी व्यक्त केले.....

****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या