🌟ब्राह्मण समाजाला तीन मिनिटात संपविण्याची धमकी देणार्‍या विरोधात सकल ब्राह्मण समाजाद्वारे कारवाईची मागणी....!


🌟सकल ब्राह्मण समाजाच्या एका शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस अधिक्षकांना दिले निवेदन🌟 

परभणी (दि.२९ फेब्रुवारी) : ब्राह्मण समाजाला तीन मिनिटात संपविण्याची धमकी देणार्‍या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सकल ब्राह्मण समाजाच्या एका शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयास सादर केलेल्या एका निवेदनाद्वारे केली आहे.

          गेल्या दोन दिवसांपासून सोशल मिडीयावर एका तथाकथित सरपंच म्हणवणार्‍या व्यक्तीची मुलाखत व्हायरल झाली आहे. त्याने ब्राह्मण समाजास तीन मिनिटात संपविण्याची धमकी दिली आहे. त्याला टाळ्या वाजवून त्याचे समर्थक साथ देवू लागले आहेत. त्यामुळे अश्या प्रवृत्ती विरोधात प्रशासनाने तात्काळ कठोर कारवाई करुन त्यांना अटक करुन करावी अशी मागणी निवेदनकर्ते डॉ. अशोक सेलगावकर, स्वप्नील पिंगळकर, सौ. मंगला मुदगलकर, सौ. शिला शेटे, दिपक कासांडे, हनुमान जोशी, अनिकेत बोर्डे, रोहित कनकदंडे, आनंद शांडिल्य, श्रीकृष्ण कनकदंडे, पुरुषोत्तम तातोडे, विशाल जोशी, कुलदिप पुरंदरे, सचिन वझूरकर, सचिन भरड, नितीन शुक्ल, सुप्रिया कुलकर्णी आदींनी केली आहे......

          

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या