🌟युवकांनी सोशल मिडियाचा सद्वविवेक बुध्दीने वापर करावा आक्षेपार्ह संदेश प्रसारित करु नये : जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे


🌟सोशल मिडियावर आक्षेपार्ह संदेश प्रसारित करणाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही : पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी


परभणी (दि.13 फेब्रुवारी) : परभणी जिल्ह्यात सर्व धर्माचे नागरिक हे एक-दुसऱ्यांचे सण उत्साहात आणि शांततेत साजरे करत आले आहेत. परंतू काही दिवसापासून संत हजरत सय्यद शाह तुराबुल हक साहेब यांच्या सुरु असलेल्या उरुस यात्रेत काही दिवसापासून अनुचित प्रकार घडत असून काही तरुण वर्ग सोशल मिडियाच्या माध्यमातून समाजात चूकीचे आक्षेपार्ह संदेश प्रसारित करुन वातावरण बिघडवत असल्याचे निदर्शनास आले आहे. 

सर्व समाजातील नागरिकांनी आप-आपल्या समाजातील तरुण युवकांना सोशल मिडियाच्या माध्यमातून चूकीच्या आक्षेपार्ह संदेश प्रसारित करु नये याबाबत समजावून सांगावे अशा सूचना जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संत हजरत सय्यद शाह तुराबुल हक साहेब यांच्या उरुस यात्रेनिमित्त शांतता समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे हे बोलत होते. यावेळी खासदार संजय (बंडु) जाधव, खासदार श्रीमती फोजिया खान, पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी,अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्या सह जिल्ह्यातील सर्व प्रतिष्ठीत नागरिकांची यावेळी उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी श्री. गावडे म्हणाले की, संत हजरत सय्यद शाह तुराबुल हक साहेब यांच्या उरुस यात्रेला 117 वर्षाची परंपरा आहे. आतापर्यंत उरुस यात्रा ही सर्व धर्माच्या नागरिकांनी शांततेत साजरा केली आहे. आणि यापूढेही आपणांस ती शांततेच साजरा करणे अपेक्षित आहे. परंतू मागील काही दिवसा पासून सोशल मिडियावर ज्या आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित होत आहे. त्यामुळे वातावरण खराब होण्याची शक्यत आहे. याकरीता  सर्व समाजातील प्रतिष्ठीत नागरिकांनी आपल्या समाजातील तरुणांना अशा पोस्ट करु नये याबाबत सांगावे. अन्यथा अशा अप्रिय घटनेचा विचार करुन कायदा सुव्यस्थेच्या दृष्टीकोनातून जिल्हा प्रशासनाला योग्य निर्णय घ्यावा लागेल. सर्व नागरिकांनी शांतता कायम राखुन पोलीस विभागास सहकार्य करावे. तसेच नागरिकांनी विशेषत: युवकांनी आपल्या सदविवेकबुद्धीचा वापर करून तसेच कुणाच्या कटाला बळी न पडता सोशल मिडियाचा काळजीपूर्वक वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले.

पोलीस अधिक्षक श्री. परदेशी म्हणाले की मागील 13 दिवसापासून उरुस यात्रा ही शांततेत सुरु आहे. परंतू काही तरुणांनी आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्याने वातावरण खराब होण्याची शक्यता होती. परंतू पोलीस विभागाने सर्व प्रकरणांवर लक्ष ठेवलेले असून, सर्व प्रकरणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणारे तरुण विद्यार्थी आहेत. त्यामुळे कोणाचेही भवितव्य खराब करण्याची इच्छा नाही. त्यामुळे नागरिक आणि तरुणांनी याबाबत सजग राहावे. पोलीस विभागाचा सायबर सेल सक्षम असून त्याद्वारे सर्व घटनांवर पोलीस लक्ष ठेवून आहे. मुलांनी चूकीच्या पोस्ट सोशल मिडियावर टाकू नये याकरीता समजावून सांगावे. अन्यथा दोषींवर कार्यवाही देखील पोलीस विभागामार्फत करण्यात येत आहे, याची नागरिकांनी नोंद घ्यावी. 

महान सुफी संत हजरत सय्यद शाह तुराबुल हक साहेब यांची परभणी येथील दरगाह सर्व धर्म समभावाचे, एकात्मतेचे प्रतिक असून, सर्व जिल्हावासियांची  श्रध्दास्थान आहे. सध्या हजरत  तुराबुल हक साहेब दर्गा येथे दरवर्षी प्रमाणे उरुस यात्रा (वार्षिक मेळावा) सुरु आहे. संपूर्ण राज्य आणि देशभरातील भक्त दरवर्षी दर्शन आणि उरुस यात्रेसाठी  दर्ग्यात येतात. त्यामुळे सर्व धर्माच्या लोकांनी यात्रेत चूकीचे प्रकार घडू नये यासाठी प्रयत्न करावे असे खासदार संजय (बंडू) जाधव यावेळी म्हणाले.जिल्ह्यातील सर्व नागरिकांना शांतता हवी आहे. उरुस यात्रा ही सर्व समाजाचा सण आहे. आणि तो सर्वांनी एकत्र येवूनच उत्साहात आणि शांततेत साजरा करायला पाहिजे. या उत्साहाच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या निधीतून दर्गा परिसरातील विविध विकासकामे होणार आहेत. मागील काही दिवसात ज्या काही अनुचित घटन घडल्या त्या निदंनीय आहे. सोशल मिडियावर चूकी संदेशी प्रसारित करु नये. सायबर क्राईम अंतर्गत दोषींवर कार्यवाही करावी असे खासदार श्रीमती फौजिया खान म्हणाल्या.यावेळी सर्व समाजातील प्रतिष्ठीत नागरिकांची उपस्थिती होती.....

****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या