🌟नैसर्गिक शेती काळाची गरज - स्वाती घोडके


🌟गाव पातळीवरील नैसर्गिक शेती प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शक म्हणूण त्या बोलत होत्या🌟 

परभणी : परभणी तालुक्यातल्या मौजे.बोरवंड खुर्द येथे 50 हेक्टरचा नैसर्गिक गट स्थापन झालेला आहे .कृषी सहायक स्वाती शिंदे यांनी आयोजित केलेल्या या गटाचे गाव पातळीवरील नैसर्गिक शेती प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शक म्हणून सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा परभणी, स्वाती घोडके यांनी नैसर्गिक शेती गटामधील सर्व शेतकऱ्यांना तसेच इतर महिला व पुरुष शेतकऱ्यांना सविस्तर रित्या प्रकल्प संचालक आत्मा दौलत चव्हाण,उपप्रकल्प संचालक आत्मा, प्रभाकर बनसावडे,तालुका कृषी अधिकारी परभणी, नित्यानंद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली  मार्गदर्शन केले त्यामध्ये नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेती यामधील फरक तसेच निमार्क, दशपर्णी अर्क, जीवामृत, घनामृत, गांडूळ खत निर्मिती इत्यादी विषयी तसेच आत्मा अंतर्गत महिला व पुरुष गट स्थापन करून प्रक्रिया उद्योगाकडे वळावे असेही मार्गदर्शन केले  नैसर्गिक शेती करणे ही काळाची गरज आहे कारणअति प्रमाणात रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे मानवी शरीरावर दुष्परिणाम होत आहे म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतीतील एक भाग का होईना पण नैसर्गिक रित्या सुरू करणे काळाची गरज असे आव्हान स्वाती घोडके यांनी केले.  कार्यक्रम यशस्वीरितेसाठी हरिभाऊ खूपसे आणि नितेश गिराम यांनी सहकार्य केले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या