🌟परभणी जिल्ह्यातील ओल्या दुष्काळात सर्वस्व गमावलेल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रशासन अनुदान देणार तरी केव्हा ?


🌟जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील उभरते नेतृत्व व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते माणिकराव सुर्यवंशींचा संतप्त सवाल🌟

🌟 जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ अनुदान जमा करण्याची मागणी🌟


परभणी जिल्ह्यातील पुर्णा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत नोव्हेंबर २०२३ या महिन्यात सर्वत्र वादळीवाऱ्यासह ढगफुटी सदृश्य परिस्थितीतून झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन,तुर,मुग,उडीद,हायब्रीड ज्वारी,बाजरी,मका,साळ तसेच मोसंबी,संत्रा,केळी,चिक्कू आदी बागायती पिकांसह पालेभाज्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले परंतु जिल्ह्यातील ओल्या दुष्काळात सर्वस्व गमावलेल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जिल्ह्यातील महसूल प्रशासनाने सरकारकडून निधी प्राप्त झाल्यानंतर देखील तिन महिन्याचा कालावधी उलटल्यानंतर देखील ओल्या दुष्काळातील अनुदान वाटप केले नाही दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रशासन शेवटी अनुदान देणार तरी केव्हा ? असा संतप्त सवाल करीत आज बुधवार दि.२८ फेब्रुवारी २०२४ रोजी परभणी जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील उभरते नेतृत्व व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते माणिकराव सुर्यवंशी यांनी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना लेखी स्वरूपात निवेदन देऊन परभणी जिल्ह्यातील पुर्णा तालुक्यासह सर्वच तालुक्यातील ओला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ नुकसानभरपाई अनुदान जमा करण्याची मागणी केली.

जिल्हाधिकारी गावडे यांना दिलेल्या निवेदनात माणिकराव सुर्यवंशी असे नमूद केले आहे की महाराष्ट्र सरकारने ओला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वाटपासाठी नुकसानभरपाई अनुदान जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातल्या शासकीय तिजोरीत जमा केले असतांना देखील महसूल प्रशासनाचे अद्यापपर्यंत ओला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाईचे अनुदान जमा केले नाही ही बाब अत्यंत गंभीर असल्यामुळे सन्माननीय जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे साहेबांनी स्वतः जातीने या प्रकरणी लक्ष देऊन ओला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ अनुदानाची रक्कम जमा करण्याचे आदेश जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातल्या तहसिलदारांना जारी करावे नसता नाईलाजास्तव वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांच्या हितासाठी तीव्र आंदोलन करण्यात येईल असे देखील म्हटले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या