🌟ईव्हीएम विरोधी देशव्यापी हस्ताक्षर अभियान आंदोलनाला प्रतिसाद....!


🌟यावेळी नागरीकांनी हस्ताक्षर बॅनरवर आपल्या सह्या करुन ईव्हीएम विरोधी अभियानाला आपला पाठींबा दिला🌟

फुलचंद भगत

वाशीम - भारतीय युवा मोर्चाच्या वतीने शुक्रवार, १६ फेब्रुवारीला स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ईव्हीएम विरोधी देशव्यापी हस्ताक्षर अभियान आंदोलन राबविण्यात आले. या आंदोलनाला विविध स्तरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी नागरीकांनी हस्ताक्षर बॅनरवर आपल्या सह्या करुन ईव्हीएम विरोधी अभियानाला आपला पाठींबा दिला. याबाबत भारतीय युवा मोर्चाच्या वतीने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नमूद आहे की, भारत देशातील ३२ राज्यांमध्ये ५६७ जिल्ह्यांमध्ये भारतीय युवा मोर्चा हे सामाजिक (एससी, एसटी, ओबीसी, व्हीजेनटी, अल्पसंख्यांक) ८५ टक्के बहुजन समाजाची संघटना म्हणून नावारूपात आलेली आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत देशात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणजे ई व्ही एम वापर २००४ पासून सक्रिय भारत देशात सुरू आहे त्याची इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या विरोधात भारतीय युवा मोर्चाने पुकारलेल्या देशव्यापी हस्ताक्षर अभियान आंदोलनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. या अभियानाच्या यशस्वीतेसाठी बहूजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय युवा सचिव सौरभ गायकवाड, राज्य उपाध्यक्ष डॉ. रवि जाधव, आत्माराम खडसे, भारत मुक्ती मोर्चा जिल्हाध्यक्ष संजय ढळे, बहूजन मुक्ती पार्टी युवा जिल्हाध्यक्ष शाम खिल्लारे, राम खिल्लारे, धम्मदास वाकोडे, प्रेमानंद अरखराव, आदर्श मोरे आदींनी परिश्रम घेतले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या