🌟लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुर्वतयारी आढावा बैठक संपन्न.....!


🌟निवडणुकीशी संबंधित सर्व कामकाजाचे पुर्व नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री.गावडे यांनी यावेळी दिल्या🌟

परभणी : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूकीशी संबंधीत सर्व यंत्रणानी योग्य नियोजन करुन पूर्वतयारी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत श्री. गावडे हे बोलत होते. यावेळी पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, अपर पोलीस अधिक्षक यशवंत काळे, उप जिल्हा निवडणुक अधिकारी जनार्धन विधाते, उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार, सार्वजनीक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. पाटील यांच्यासह सर्व नोडल अधिकारी यांची यावेळी उपस्थिती होती.

यावेळी श्री. गावडे म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणूकीशी संबंधीत सर्व यंत्रणांवर सोपविण्यात आलेली कामकाजाची जबाबदारी संबंधीतांनी योग्य पार पाडावी. यामध्ये इंटरनेट सेवा, वीज पूरवठा,  वाहतूक व्यवस्था, निवडणूक कामासाठी असलेले मनुष्यबळ, कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलिस बंदोबस्त, आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे, यासाठी स्थापन केलेले कक्ष, कक्षांचे कामकाज, कक्षांकडून करण्यात आलेली कार्यवाही आणि निवडणुकीशी संबंधित सर्व कामकाजाचे पुर्व नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री.गावडे यांनी यावेळी दिल्या.

* संभाव्य मतमोजणी कक्ष आणि स्ट्रॉंग रुमची पाहणी :-

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील संभाव्य मतमोजणी कक्ष आणि स्ट्रॉंग रुमची जिल्हाधिकारी श्री. गावडे आणि पोलीस अधिक्षक श्री. परदेशी यांनी आज पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी महाविद्यालयाच्या आवारातील विविध कक्षाची पाहणी करून मागील निवडणुकीत केलेल्या व्यवस्थेची माहिती घेतली. यावेळी निवडणूक आयोगाची मान्यता मिळताच संभाव्य मतमोजणी कक्ष आणि स्ट्रॉंग रूम तसेच माध्यम कक्ष, पार्किंग व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती पुर्व तयारी करण्याच्या सूचना दिल्या. 

यावेळी पोलीस अधिक्षक श्री. परदेशी यांनी देखील संभाव्य मतमोजणी कक्ष आणि स्ट्रॉंग रुमच्या सुरक्षा आणि कायदा सुव्यस्थेच्या दृ्ष्टीकोनातून संबंधीतांना आवश्यक त्या सूचना दिल्या......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या