🌟पुर्णा नगर परिषद सर्वसाधारण सभेत सोनार समाज मंदिर व सांस्कृतिक सभागृहाचा ठराव पास अंमलबजावणी अद्याप नाही...!


🌟तत्कालीन नगराध्यक्ष विशाल कदम यांच्या कारकीर्दीत सन २०१६ यावर्षी घेण्यात आला ठराव :  ठरावाला आठ वर्षे पुर्ण🌟


पुर्णा (दिल.२४ फेब्रुवारी) - पुर्णा नगर परिषद नगराध्यक्ष पदाचा पदभार सन २०१६ यावर्षी कार्यरत विशाल विजयकुमार कदम यांच्याकडे असतांना सोनार समाज युवा मंच या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास शहाणे यांनी दिलेल्या निवेदनावर तत्कालीन नगराध्यक्ष विशाल कदम यांनी तात्काळ निर्णय घेऊन दि.०४ ऑगस्ट २०१६ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत स्वतः ठराव मांडून ठराव क्रमांक ०५/०७ अंतर्गत शहरातील दत्तमंदिर परिसरातील जुनी कोर्ट इमारत मागील जागा सोनार समाज मंदिर व सांस्कृतिक सभागृहासाठी देण्याचे सर्वानुमते ठरले परंतू या ठरावाला आज पावेतो तब्बल आठ वर्षाचा कालावधी उलटल्यानंतर देखील या ठरावाची नगर परिषद प्रशासनाच्या वतीने अंमलबजावणी करण्यात आलेली नसल्यामुळे नगर परिषद प्रशासन किती बेजबाबदार आहे याचा प्रत्यय या प्रकरणातून निदर्शनास येत आहे.

पुर्णा नगर परिषद सोनार समाज मंदिर व सांस्कृतिक सभागृहाच्या ठरावाची अंमलबजावणी करण्यास जाणीवपूर्वक तर टाळाटाळ करीत नाही ना ? असा गंभीर प्रश्न आता सोनार समाजात उपस्थित होत असून सदरील ठरावाची अंमलबजावणी करण्यात येवून जागा सोनार समाजास उपलब्ध करून देण्यात यावी याकरिता दिलं.०७ फेब्रुवारी २०२४ रोजी सोनार समाज युवा मंच या सामाजिक संघटनेने नगर परिषद मुख्यधिकारी यांना पुन्हा निवेदन देऊन पुर्णा नगर परिषद सर्वसाधारण सभेत पास करण्यात आलेल्या ठराव क्र.०५/०७ या ठरावाची अंमलबजावणी करुन सोनार समाज मंदिरासाठी उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

पुर्णा नगर परिषद मुख्यधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की पुर्णा नगर परिषदेच्या दि.०४ ऑगस्ट २०१६ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभे अंतर्गत सोनार समाज युवा मंच पुर्णा अध्यक्ष श्रीनिवास शहाणे व इतर यांच्याकडून प्राप्त झालेल्या विनंती अर्जाच्या आधारें सर्वानूमते ठराव क्र.०५/०७ अन्वये ठराव पास करुन जुन्या कोर्ट इमारतीच्या मागील मोकळी उर्वरित जागा सोनार समाज मंदिर व सांस्कृतिक सभागृहासाठी देण्या संदर्भात मान्यता देण्यात आली होती.या इमारतीच्या मागील उर्वरित जागेचे मोजमाप हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात यावे व सदर बाबींचा रितसर प्रस्ताव साहाय्यक संचालक नगर रचना परभणी यांचेकडे पाठविण्यात येऊन सर्व रितसर बाबींची पुर्तता करुन सदर जागा ही सोनार समाज मंदिर व सांस्कृतिक सभागृहासाठी देण्यास देखील सभागृहाने सर्वानूमते मान्य केले होते परंतु सदरील जागा अद्यापपर्यंत सोनार समाजाला देण्यात आलेली नाही तरी में मुख्याधिकारी साहेब यांनी तात्काळ ही जागा सोनार समाजास देऊन सर्वसाधारण सभेच्या ठरावाची पुर्तता असेही निवेदनात म्हटले असून या निवेदनावर सोनार समाज युवा मंच या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष श्रीनिवास शहाणे यांची स्वाक्षरी आहे या निवेदनावर मुख्याधिकारी युवराज पौळ काय निर्णय घेतात याकडे सोनार समाजाचे लक्ष लागले आहे........



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या