🌟सांस्कृतिक कार्यक्रमात चिमुकल्यांच्या अभिनयाने प्रेक्षक झाले मंञमुग्ध....!


🌟देशभक्ती,राष्टीय एकात्मता,आदिवाशी नृत्य,सामाजिक सलोख्यावर सादर केली नृत्य🌟

✍🏻फुलचंद भगत

वाशिम :- मंगरुळपीर येथील यशवंतराव चव्हाण इंग्लिश स्कूल व प्रतिभा प्राथमिक मराठी व इंग्रजी शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमास दि.28 जानेवारी रोजी सुरवात झाली.या कार्यक्रमाचे ऊद्घाटक म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे होते तर अध्यक्षस्थानी प्रियाताई ठाकरे तर प्रमुख अतिथी म्हणून गोंदेवार, प्राचार्य भोयर, वाय. सी.इंग्लिश स्कूल प्राचार्य सारा व पालक प्रतिनिधी डॉ. सोमटकर,प्रा. राऊत, नरळे, व्यास,सदानंद इंगोले, सारिका व्यास हे होते.


यावेळी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. याप्रसंगी चंद्रकांत ठाकरे म्हणाले की,विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपिठ निर्माण सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातुन होते त्यामुळे अशा कार्यक्रमाच्या माध्यमातुनच कलाकार घडतात.राज्याचा समृद्ध संस्कृती वारसा टिकला पाहिजे म्हणून आपल्या जिल्ह्यामध्ये महोत्सव आयोजन केल्याचे सांगीतले. 

पहिल्या दिवसापासून सुरू आसलेल्या या स्नेहसंमेलनाला पालक वर्गांनी मोठी गर्दी केली. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नुत्य, आदिवासी नृत्य,सामाजिक सलोखा दाखवणारे सादरीकरण केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिभा प्राथमिक इंग्रजी शाळेच्या प्राचार्य माधुरी व्यास यांनी केले.सूत्रसंचालन प्रतिभा महाले व प्राजक्ता मानेकर यांनी तर काटेकर यांनी आभार मानले.या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शीतल मुळे, वैशाली गावंडे, चांद गारवे, नीता नरळे, प्रिया खडसे, प्रतिमा शेरेकर, शीतल जमजारे,आदींनी परिश्रम घेतले.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम

मो.8459273206

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या