🌟नांदेड येथील तख्त सचखंड गुरुद्वाऱ्यावर सरकारने लादलेल्या नवीन कायद्या विरोधातील आंदोलनाकडे लोकप्रतिधींचे दुर्लक्ष...!


🌟आंदोलनकर्त्यांमध्ये नाराजीची भावना : आंदोलनचा आज सोळावा दिवस आहे🌟

नांदेड (दिल.२४ फेब्रुवारी) - गुरुद्वारा बोर्ड अधिनियम 2024  विरोधामध्ये मागील पंधरा दिवसापासून शिख समाजाचे  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करीत आहेत. सदर आंदोलनाकडे सत्ताधारी  लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये नाराजीचा सुर उमटत आहे.


      मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जुना गुरुद्वारा बोर्ड अधिनियम रद्द करून नवीन अधिनियम सुचित करण्यात आला आहे. या अधिनियम विरोधात मागील स सोळा दिवसापासून शिख समाज बांधव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी पोषण करीत आहेत. विविध पक्षाच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाला प्रत्यक्ष भेट देऊन जाहीर पाठिंबा दर्शविला. परंतु केंद्र व राज्यात सत्ताधारी असलेले भाजपच्या आमदार  व खासदारांनी याकडे दुर्लक्ष केल्याने समाजामध्ये नाराजीचा सूर उमटत असल्याचे दिसत आहे. 

     आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंनप्रीत सिंग कुंजीवाले, जसपाल सिंग लांगरी, एड. सुरेंद्र सिंग लोणीवाले. गुरुदीप सिंह संधू. गुरमीत सिंग बेदी. सरबजी‌तसिंग हॉटेलवाले, विक्रमजीत सिंग मदतगार. यांनी उपोषण केले. यांच्यासोबत शेरसिंघ फौजी, गुरमीतसिंग महाजन, रवींद्र सिंग बुंगई. मनबीरसिंघ ग्रंथि , दीपकसिंघ गल्लीवाले , राजेंद्रसिंग पुजारी, जर्नलसिंग गाडीवाले, मनिंदर सिंग रामगडिया. करणसिंघ लोनिवाले , रवींद्रसिंग पूजारी, कृपालसिंग हजुरिया, सिमरंजीतसिंग कुंजीवाले, तेगा सिंग बावरी. हरभजनसिंघ पुजारी.  दीपकसिंघ हजूरिया, बीरेंद्रसिंघ बेदी, महेन्दरसिंघ पैदल, सुरेंद्रसिंग मेंबर ,  अवतारसिंग पहरेदार , जसबीर सिंग बुगंई.गुरप्रितसिंग सोखी, मंनप्रीतसिंग कारागीर, हरभजन सिंग दिगवा. कश्मीर सिंग भट्टी.सुखविंदरसिंग हुदल, इंदर सिंग शाहू, गुरुदीपसिंघ संधू, अमरजीतसिंग कुंजीवाले, भोला सिंग गाडीवाले. किरण सिंग शाहू. बाबू सिंग बासरीवाले. बलजीत सिंग बावरी.  केहर सिंग अमरजीत सिंग महाजन जगजीतसिंग खालसा, हरप्रीत सिंग पुजारी. ऋषी भाटिया.यांनी सहभाग घेतला.

      शिख समाजाचा नेहमीच सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडे कल दिलेला आहे नांदेड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे तीन आमदार व तीन खासदार असताना देखील सत्ताधारी पक्षाच्या कोणत्याही लोकप्रतिनिधींनी उपोषण स्थळास भेट दिली नसल्याने आंदोलकर्त्यांमध्ये नाराजी पसरत आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या