🌟पुर्णा तालुक्यात झिरो टी पॉईंट,झिरोफाटा,कातनेश्वर,माटेगाव,नावकी,गौर,चुडावा पिंपळा भत्या,कावलगावसह अनेक ठिकाणी रास्ता रोको.....!


🌟यावेळी प्रत्येक रास्ता रोको आंदोलनस्थळी असंख्य मराठा समाज बांधव रस्त्यावर ठाण मांडून बसले होते🌟


पुर्णा (दि.२४ फेब्रुवारी) - मराठा आरक्षणाच्या संदर्भात  सरकारने सगेसोयरे अधिसूचना काढून त्याची अंमलबजावणी न केल्याबद्दल आज पुर्णा शहरातील झिरो टी पॉईंटसह तालुक्यातील झिरोफाटा, कातनेश्वर, माटेगाव,नावकी,गौर,चुडावा पिंपळा भत्या,खुजडा,ताडकळस येथे सकाळी १०.३० ते दुपारी १ दरम्यान दरम्यान शांततेत लोकशाही मार्गाने भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 


महाराष्ट्र सरकार जोपर्यंत अधिसूचनेचे रूपांतर कायद्यात करीत नाही तोपर्यंत समाज स्वस्थ बसणार नाही असा इशारा देखील यावेळी देण्यात आला यावेळी आंदोलकांच्या वतीने पुर्णा पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक विलास गोबाडे यांच्यासह तहसिलदार प्रशासनातील अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आली यावेळी प्रत्येक रास्ता रोको आंदोलनस्थळी असंख्य मराठा समाज बांधव रस्त्यावर ठाण मांडून बसले होते......टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या