🌟नांदेड येथील गुरुद्वारा बोर्डावर सरकारने लादलेल्या नवीन कायदा विरोधी आंदोलनाकडे प्रशासन/लोकप्रतिनिधी लक्ष देतील काय ?


🌟सिख समुदायासह आंदोलनकर्त्यांचा संतप्त सवाल : साखळी उपोषण आंदोलनाला आज १८ वा दिवस🌟

     नांदेड (दिल.२६ फेब्रुवारी)- गुरुद्वारा बोर्ड अधिनियम २०२४  विरोधामध्ये मागील सतरा दिवसापासून शिख समाजाचे  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करीत आहेत. सदर आंदोलनाकडे सत्ताधारी  लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये नाराजीचा सुर उमटत आहे.

       मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जुना गुरुद्वारा बोर्ड अधिनियम रद्द करून नवीन अधिनियम सुचित करण्यात आला आहे. या अधिनियम विरोधात मागील १८ दिवसापासून शिख समाज बांधव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी पोषण करीत आहेत. विविध पक्षाच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाला प्रत्यक्ष भेट देऊन जाहीर पाठिंबा दर्शविला. परंतु केंद्र व राज्यात सत्ताधारी असलेले आमदार  व खासदारांनी याकडे दुर्लक्ष केल्याने समाजामध्ये नाराजीचा सूर उमटत असल्याचे दिसत आहे. 

     आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स. राजेंद्र सिंग पुजारी.स. हरभजन सिंग गुरु सेवक तेजवंत सिंग पूडं.स. जसपित सिंग चाहल.स. दिलीप सिंग लांगरी.

.यांनी उपोषण केले. यांच्यासोबत शेरसिंघ फौजी, गुरमीतसिंग महाजन, मनप्रीत सिंग कुंजीवाले.रवींद्र सिंग बुंगई. मनबीरसिंघ ग्रंथि , दीपकसिंघ गल्लीवाले , जगदीप सिंग नंबरदार.जर्नलसिंग गाडीवाले, मनिंदर सिंग रामगडिया. करणसिंघ लोनिवाले , रवींद्रसिंग पूजारी, कृपालसिंग हजुरिया, सिमरंजीतसिंग कुंजीवाले, तेगा सिंग बावरी. .  दीपकसिंघ हजूरिया, बीरेंद्रसिंघ बेदी, एडवोकेट सुरेंद्र सिंग लोणी वाले. महेन्दरसिंघ पैदल, अवतारसिंग पहरेदार , जसबीर सिंग बुगंई.गुरप्रितसिंग सोखी, मंनप्रीतसिंग कारागीर, हरभजन सिंग दिगवा. कश्मीर सिंग भट्टी.सुखविंदरसिंग हुदल,, गुरुदीपसिंघ संधू, अमरजीतसिंग कुंजीवाले, भोला सिंग गाडीवाले. जसपाल सिंग लांगरी.  केहर सिंग अमरजीत सिंग महाजन जगजीतसिंग खालसा, हरप्रीत सिंग पुजारी. यांनी सहभाग घेतला. आज उपोषणच्या अठरावा दिवशी आंदोलनकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतली. व तीर्व नाराजगी व्यक्त केली. कलम 11 व गुरुद्वारा अधिनियम 2024 रद्द करण्याची केली मागणी. यावेळी त्यांनी हजुरी शिख समुदायाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन देऊन उपोषण स्थळाला प्रत्यक्ष भेट देणार असल्याची देखील यावेळी हजुरी सिख समुदायाला सांगितले सत्ताधारी पक्षाच्या कोणत्याही लोकप्रतिनिधींनी उपोषण स्थळास भेट दिली नसल्याने आंदोलकर्त्यांमध्ये नाराजी पसरत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या