🌟 नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणजे सर्वसमावेशक नेतृत्व....!


🌟प्रामाणिकपणा नम्रता,शिस्त विद्वत्ता या गुणांनी खासदार चिखलीकर साहेब शोभून दिसतात🌟

✍🏻लेखक: सुनिल रामदासी नांदेड 

    उजाड ओसाड रानावर ज्ञानबाग फुलविणारे ,दिलेल्या शब्दाला जागणारे,बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या ओळी ज्यांना सार्थपणे लागू पडतात ते नांदेड जिल्ह्याचे भाग्यविधाते हजारो जणांना  अनमोल मदत करणारे गोरगरिबांच्या लेकरांची समस्या जाननारे व त्याना प्रोत्साहन देणारे आमचा मान सन्मान स्वाभिमान एक ज्ञानप्रिय व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब.


आदरणीय साहेब,तुमच्या सहवासात, संस्कारात मनाच्या अंगणात उत्साहाचे चांदणे सतत बरसत असते,आकाशाच्या चांदव्याला ताऱ्यांचा प्रकाश आणि नक्षत्राची तेजस्विता लगडून जाते. अनमोल ज्ञानाने आनंदी मनात अमावस्या वास्तव्याला कधीच राहत नाही आणि भौतिक सृष्टीचे लौकीक नियम मानवी मनाच्या प्रतलावरून कायमचॆ दूर होतात. आपण उत्साही अभ्यासपूर्ण वक्तृत्वाने विद्यार्थ्यांना दिलेल्या शिकवणुकीमुळे जीवनातील प्रत्येक रात्र पौर्णिमा होऊन जाते. असे जीवन दुर्मिळ आनंद प्रफुल्ल उल्हास आणि गंधभरल्या चैतन्याने आनंदून जाते.

            रंजल्या गांजल्यांसाठी आपण चंदनासम झिजल्याने, अविरत कष्टाने त्या विद्यार्थ्यांच्या कार्यात उत्साह संचारतो त्या उत्साहाचा सुंदर सकारात्मक जीवन घडविण्यासाठी निश्चितच लाभ होतो. आपल्या निर्मोही वागण्याने सळसळता उत्साह पंचेइंद्रियांना कार्यशील कार्यमग्न ठेवून सत्कर्म करण्यासाठी अक्षय सूर्यऊर्जा पुरवत असतो. सततच्या प्रेरणादायी शब्दाने  माझ्यासह अनेकांच्या जीवनातील प्रगतीचे सारे मार्ग प्रशस्त होत जातात. खेड्यापाड्यात राहणाऱ्या वाडीवस्तीत जीवन व्यतीत करून ज्ञानार्जन करणाऱ्या अनेक होतकरू विद्यार्थ्यांना तुम्ही सर्वश्रेष्ठ विद्यापीठ वाटता आणि आहातही.


        प्रामाणिकपणा नम्रता, शिस्त विद्वत्ता या गुणांनी तुम्ही शोभून दिसता. आजच्या युवकांसाठी आदरणीय साहेब आपण अनमोल आदर्श आहात. आपले आदरणीय पिता शांतिदूत गोविंदराव पाटील चिखलीकर यांनी अविरत प्रयत्नांनी गोरगरिबांच्या लेकरांसाठी ज्ञान दरवाजे उघडे केले त्याप्रमाणे आपणही त्यांची सुंदर परंपरा चालवत आहात. मोदी साहेबांचे विश्वासू खासदार असे प्राप्त केलेले यश आम्हा सर्वांसाठी अतिशय आनंददायी आणि प्रेरणादायी आहे.  आनंदात ऐश्वर्यात  जीवन जगणेऐवजी कष्टकऱ्यांच्या, रंजल्या गांजल्यांच्या लेकरासाठी धावून जाता हा आपला गुण आम्हा सर्वांसाठी फार मोठे कार्य करण्याची ऊर्जा देणार आहे. शेतकऱ्याची, कष्टकऱ्याची लेकरं मेहनतीने गुण प्राप्त करतात त्यांना प्रोत्साहन दिल. क्षेत्रातील अडचणी दूर केल्या दिल्ली सारख्या ठिकाणी आपल्या नांदेडच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करता यावी याकरता निवासाची राहण्याची  व्यवस्थाआपण केली. संत तुकाराम महाराज लिहितात "बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले" आपण अगदी असेच आहात.सर्वजण स्वतःसाठी जगतात पण तुम्ही मात्र इतरांसाठी जगता इतरांच्या घरांमध्ये ज्ञानदीप तेवण्यासाठी आपण आजही खूप कष्ट करता तेव्हा हृदय भरून येते आणि आपल्यात उद्याचे स्वामी विवेकानंद, साने गुरुजी, इत्यादी महानपुरुष आम्हाला दिसायला लागतात. आपले हे कार्य महान आहे. मानवतेचे उत्तम उदाहरण आहे .आपले कार्य ही खऱ्या अर्थाने परमेश्वराची पूजा आहे. आपल्या ज्ञान क्षेत्रातील कार्याला शुभेच्छा ...!!!

लेखक : सुनिल रामदासी

पत्रकार

9423136441

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या