🌟विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे - कथाकार राजेंद्र गहाळ


🌟जय किसान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय लिमला येथील १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी ते म्हणाले🌟 

परभणी : वाचन लेखन व चिंतन या त्रिसूत्रीतून अभ्यास करून मनावर दडपण न ठेवता विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे असे ग्रामीण कथाकार राजेंद्र गहाळ यांनी आवाहन केले लिमला येथील जय किसान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मंगळवार दि.१२ फेब्रुवारी २०२४ रोजी श्री गहाळ बोलत होते. 

    कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्षा सौ. नर्मदाबाई जोगदंड, प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष दुर्गादास जोशी, राजेंद्र गहाळ, प्राचार्य अनंत काळे,राम गोटमुकले, विजय कदम, हनुमंत हंबीरे आदी उपस्थित होते पुढे बोलताना श्री गहाळ म्हणाले की वाचताना वेचायच.वेचून बुद्धीत साठवायचे.. आणि परीक्षेत आठेवायचे हा मंत्र विद्यार्थ्यांनी अंगी बानावा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजुषा कोल्हे तर आभार गजानन देशमुख यांनी केलं.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या