🌟परभणी जिल्ह्यात शिवसेनेला खिंडार : युवा सेनेचे मा.उपजिल्हा प्रमुख माणिकराव सुर्यवंशी यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश...!


🌟वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश सोहळा संपन्न🌟


परभणी/पुर्णा : शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परभणी जिल्ह्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) या पक्षा अंतर्गत बंडाळीला सुरूवात झाल्याचे निदर्शनास येत असून ग्रामीण भागासह अल्पसंख्यांक समाजातील कार्यकर्त्यांना पक्षात दुय्यम दर्जाची वागणूक मिळत असल्याने अनेकांनी यापुर्वीच शिवसेना शिंदे गटाचा 'धनुष्य बाण' हाती घेऊन महाभारताला सुरूवात केली असतांनाच शिवसेना (उबाठा) पक्षाची युवा आघाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युवा सेनेचे माजी तालुकाध्यक्ष तथा माजी उपजिल्हाध्यक्ष तथा खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखल्या जाणारे माणिकराव सुर्यवंशी यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह आज सोमवार दि.२६ फेब्रुवारी २०२४ रोजी परभणी येथील सावली शासकीय विश्रामगृह येथे दुपारी ०१-०० वाजेच्या सुमारास वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला.


परभणी जिल्ह्यातील पुर्णा तालुक्यातल्या मौ.निळा गावातील रहिवासी असलेल्या माणिकराव सुर्यवंशी यांनी आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात सन २००१ यावर्षी अखिल भारतीय छावा मराठा संघटनेच्या माध्यमातून केली तब्बल एक दशकापर्यंत सामाजिक कार्यात स्वतःला झोकुन घेतल्यानंतर सन २०१० यावर्षी त्यांनी तत्कालीन शिवसेना आमदार सौ.मिराताई कल्याणराव रेंगे व तत्कालीन युवा सेना परभणी जिल्हा प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला त्यांची कर्तृत्व व वकृत्व क्षमता लक्षात घेत पक्षाने त्यांची युवा सेना पुर्णा तालुकाध्यक्ष पदावर नेमणूक केली त्यांनी आपल्या कर्तृत्व व वकृत्व क्षमतेच्या बळावर ग्रामीण भागात युवा सेनेची पाळेमुळे रोवली यानंतर त्यांच्याकडे उपजिल्हा प्रमुख पदाचा पदभार सोपविला गेला या पदाला देखील त्यांनी न्याय दिला तब्बल दिड दशकापर्यंत त्यांनी इमानेइतबारे पक्षाचे काम केले परंतु पक्षात ग्रामीण भागासह बहुजन समाजातील कर्तृत्ववान कार्यकर्त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळत असल्यामुळे आपण वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष श्रध्देय प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करीत असून यापुढे ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर रोजमजूरांसह तमाम अठरा पगड समाजाला सोबत घेऊन बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम करणार असल्याचे आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना माणिकराव सुर्यवंशी म्हणाले त्यांच्या या प्रवेश सोहळ्यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष किशन चव्हाण,परभणीचे माजी जिल्हाध्यक्ष दादाराव पंडित,मुंबई समन्वयक अरुण आबा जाधव,गंगाखेड तालुकाध्यक्ष दिगंबर अण्णा गोबाळे,डॉ.धर्मराज चव्हाण आदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या