🌟महाराष्ट्र सरकारने सचखंड गुरुद्वाऱ्यावर लादलेल्या नवीन कायद्या विरोधातील साखळी उपोषणाचा आज १७ वा दिवस...!.


🌟 नवीन कायद्याला स्थगिती मग महाराष्ट्र सरकारने अद्याप जीआर का काढला नाही ? सिख बांधवांचा संतप्त सवाल🌟

🌟स्थानिक लोकप्रतिनिधीचे मागील १७ दिवसांपासून सुरु असलेल्या नवीन गुरुद्वारा कायद्या विरोधातील आंदोलनाकडे दुर्लक्ष🌟

🌟गुरुद्वाऱ्यावर नवीन कायदा लादण्याची महाराष्ट्र सरकारची भुमिका संशयास्पद🌟

🌟सिख बांधवांच्या नवीन कायद्या विरोधातील साखळी उपोषणाची प्रशासकीय स्तरावर अद्याप देखील दखल नाही🌟

🌟आंदोलनकर्त्यांनी घेतली मा.मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण यांची भेट🌟

नांदेड (दिल.२५ फेब्रुवारी) - देशासह संपूर्ण जगात नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्राला सर्वोच्च स्थान प्राप्त करुन देणाऱ्या पवित्र तख्त सचखंड हुजूर साहीब अबचल नगर नांदेड या सिख धर्मियांच्या पाच पवित्र तख्तांपैकी एक सर्वोच्च तख्त मानल्या जाते देश विदेशातील सिख यात्रेकरू दर्शनासाठी येथे येतात व या पवित्र तिर्थक्षेत्राला मोठ्या प्रमाणात चढावा (दाण) देत असतात याही पेक्षा महत्वाची बाब म्हणजे या पवित्र तख्त सचखंड गुरुद्वाराची शहरातील मध्यवर्ती भागासह विविध भागात मोठ्या प्रमाणात जमीन संपत्ती असल्याने या जमीन संपत्तीवर प्रशासनासह भुमाफीयांचा सुध्दा डोळा असल्याने गुरुद्वाऱा बोर्डात वेळोवेळी राजकीय/प्रशासकीय हस्तक्षेप होत असतो.मागील इतिहास पाहता सिख समुदायाने शहराच्या विकासात्मक घडामोडीत वेळोवेळी योगदान दिल्याचे निदर्शनास येते शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील कोट्यावधी रुपयांचा भुखंड गुरुद्वाऱा बोर्डाने नांदेड जिल्हा शासकीय रुग्णालयासाठी दिला होता सदरील रुग्णालयास श्री गुरू गोविंदसिंघजी मेमोरियल शासकीय रुग्णालय असे नाव देखील देण्यात आले होते परंतु मागील काही वर्षांपूर्वी सदरील नांदेड जिल्हा शासकीय रुग्णालय विष्णुपुरी येथे स्थलांतरित करण्यात आले सन २०१६ यावर्षी तत्कालीन महाराष्ट्र सरकारने गुरुद्वाऱा ॲक्ट १९५६ या कायद्यातील कलम ११ मध्ये संशोधन करून तख्त सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष निवडण्याचा अधिकार स्वतःकडे ठेवून सिख समुदायाचा लोकतांत्रिक अधिकार हिरावून घेत सिख धर्मियांच्या धार्मिक बाबींमध्ये सरळसरळ हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली अन् आतातर महाराष्ट्र सरकारने सचखंड गुरुद्वाराचे सन्माननीय मुख्य जत्थेदार साहेब तसेच पंचप्यारें साहिबान यांच्यासह स्थानिक हुजूरी सिख समुदायाला कुठल्याही प्रकारची पुर्वकल्पना न देता दि.०५ फेब्रुवारी २०२४ रोजी गुरुद्वाऱा ॲक्ट १९५६ हा कायदाच मोडीत काढून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवीन गुरुद्वारा अधिनियम-२०२४ हा कायदा पास करुन पवित्र तख्त सचखंड गुरुद्वाऱ्यावर लादल्याचा कुटील डाव आखत तब्बल १२ सदस्यासह गुरुद्वाऱा बोर्ड अध्यक्ष नियुक्त करण्याचे सर्वाधिकार स्वतःकडे ठेवल्याने स्थानिक हुजूरी सिख समुदायात तिव्र असंतोष पसरला या नवीन कायद्या विरोधात हुजूरी सिख समुदायाकडून सन्माननीय संत महापुरुषांच्या नेतृत्वाखाली दि.०९ फेब्रुवारी २०२४ रोजी या नवीन कायद्याच्या निषेधार्थ ऐतिहासिक मोर्चा काढण्यात आला परंतू या ऐतिहासिक मोर्चाची देखील शासनाने दखल न घेतल्याने सिख समुदायाकडून याच दिवशी दि.०९ फेब्रुवारी २०२४ रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणासह निदर्शनास सुरुवात करण्यात आली या साखळी उपोषण व निदर्शनाचा आज रविवार दि.२५ फेब्रुवारी २०२४ रोजी १७ वा दिवस असतांना देखील सदर आंदोलनाकडे सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींसह जिल्हा प्रशासन देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये. प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाराष्ट्र सरकारने सचखंड गुरुद्वाऱ्यावर लादलेल्या या नवीन गुरुद्वारा अधिनियम कायद्या विरोधात मागील सतरा दिवसांपासून सिख समुदायाकडून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकतांत्रिक पध्दतीने आपल्या धार्मिक मुलभूत अधिकारांसाठी साखळी उपोषण सुरू करण्यात आले असतांना विविध पक्षाच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाला प्रत्यक्ष भेट देऊन जाहीर पाठिंबा दर्शविला परंतु अत्यंत दुर्दैवाची बाब म्हणजे केंद्रासह राज्यात सत्ता असलेल्या सत्ताधारी पक्षाच्या आमदार  व खासदारांनी या आंदोलनाकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याने सिख समुदायात  नाराजीचा सूर उमटत आहे आज रविवार दि.२५ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बलजीत सिंग बावरी सिख सिक्लिकर सोसायटी महाराष्ट्र अध्यक्ष,वीर सिंग.जगतार सिंग. जगदीप सिंग. बलवंत सिंग.यांनी उपोषण सुरु केले असून त्यांना शेरसिंघ फौजी, गुरमीतसिंग महाजन, मनप्रीत सिंग कुंजीवाले.रवींद्र सिंग बुंगई. मनबीरसिंघ ग्रंथि , दीपकसिंघ गल्लीवाले , राजेंद्रसिंग पुजारी, जगदीप सिंग नंबरदार.जर्नलसिंग गाडीवाले, मनिंदर सिंग रामगडिया. करणसिंघ लोनिवाले ,रवींद्रसिंग पूजारी, कृपालसिंग हजुरिया, सिमरंजीतसिंग कुंजीवाले, तेगा सिंग बावरी. हरभजनसिंघ पुजारी.  दीपकसिंघ हजूरिया, बीरेंद्रसिंघ बेदी, एडवोकेट सुरेंद्र सिंग लोणी वाले. महेन्दरसिंघ पैदल, सुरेंद्रसिंग मेंबर ,  अवतारसिंग पहरेदार , जसबीर सिंग बुगंई.गुरप्रितसिंग सोखी, मंनप्रीतसिंग कारागीर, हरभजन सिंग दिगवा. कश्मीर सिंग भट्टी.सुखविंदरसिंग हुदल, इंदर सिंग शाहू, गुरुदीपसिंघ संधू, अमरजीतसिंग कुंजीवाले, भोला सिंग गाडीवाले. किरण सिंग शाहू. जसपाल सिंग लांगरी.  केहर सिंग अमरजीत सिंग महाजन जगजीतसिंग खालसा, हरप्रीत सिंग पुजारी.पाठिंबा देत साखळी उपोषणात सहभाग घेतला. 

आज उपोषणच्या सतराव्या दिवशी आंदोलनकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतली. व तीर्व नाराजगी व्यक्त केली. कलम 11 व गुरुद्वारा अधिनियम 2024 रद्द करण्याची केली मागणी. यावेळी त्यांनी हजुरी शिख समुदायाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन देऊन उपोषण स्थळाला प्रत्यक्ष भेट देणार असल्याची देखील यावेळी हजुरी सिख समुदायाला सांगितले.सत्ताधारी पक्षाच्या कोणत्याही लोकप्रतिनिधींनी उपोषण स्थळास भेट दिली नसल्याने आंदोलकर्त्यांमध्ये नाराजी पसरत आहे..........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या