🌟संत बिरबलनाथ मंदीरात भाविकांची मांदीयाळी;हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ.....!


🌟यावेळी संत महंत,ऋषी यांच्या उपस्थितीत महाप्रसादाचे वितरण करण्यात आले🌟


✍🏻फुलचंद भगत-मंगरुळपीर

वाशिम:-मंगरुळपीर येथील योग तपस्वी संत श्री बिरबलनाथ महाराज  यांच्या यात्रोत्सव निमित्त दि २९ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा लाभ पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांनी घेतला.यावेळी संत महंत,ऋषी यांच्या उपस्थितीत महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. तसेच यावेळी महा आरती करण्यात आली.

             यावेळी महिला व पुरुष अश्या दोन लाईन बारी मधून महाप्रसादाचे वितरण यावेळी करण्यात आले.या प्रसंगी संस्थानच्या अध्यक्षा पुष्पाताई रघुवंशी,सचिव रामकुमार रघुवंशी,संस्थानचे विश्वस्त अविशसींह रघूवंशी,कृष्णासिंह रघुवंशी,उत्तम पाटील,सिताराम दबडे महाराज,तिवारी महाराज यांचे सह नाथ भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.यांचेसह  वितरण शांततेत पार पडावे यासाठी ठाणेदार सुधाकर आडे यांचे मार्गदर्शनात पोलीस व महीला पोलीस होमगार्ड सैनिकांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी सेवादारी मोठया संख्येने उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या