🌟परभणी जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन....!


🌟असे आवाहन सहायक संचालक श्रीमती गीता गुठ्ठे यांनी केले आहे🌟

परभणी (दि.23 फेब्रुवारी) : सन 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी सहायक संचालक कार्यालयांतर्गत विजाभज, विमाप्र आणि इमाव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मुलांच्या शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेशाची संधी उपलब्ध झाली आहे. इयत्ता 12 वी नंतरच्या उच्च शिक्षण घेणा-या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये विनामूल्य प्रवेश ऑफलाईन पध्दतीने देण्यात येणार आहे. गरजू विद्यार्थ्यांनी प्रवेशाबाबतचे अर्ज सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, परभणी कार्यालयातुन विनामुल्य अर्ज प्राप्त करून आवश्यक कागदपत्रांसह दि. 5 मार्च 2024 पर्यंत सादर करावेत तसेच अधिक माहितीसाठी सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाचा (02452-220595) दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सहायक संचालक श्रीमती गीता गुठ्ठे यांनी केले आहे......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या