🌟पुर्णा शहरात महाराष्ट्र ननिर्माण सेनेच्या वतीने कारसेवकांसह रामभक्तांचा भव्य गौरव सोहळा संपन्न.....!


🌟गौरव सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुर्णा तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष डॉ.जयप्रकाश मोदाणी यांची उपस्थिती🌟 


पुर्णा : पुर्णा शहरातील आनंद नगर परिसरातील लोककल्याण बॅंकेजवळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रविवार दि.04 फेब्रुवारी 2024 रोजी आयोध्या येथील रामजन्मभूमी मंदिर निर्माणसाठी बलिदान व योगदान देणाऱ्या कारसेवकां बरोबरच पुर्णा शहरात भूतो न भविष्य अशी शोभायात्रा व दरवर्षी रामनवमी साजरी करणाऱ्या श्रीराम भक्तांचा भव्य गौरव सोहळा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसे नेते दिलिप बापू धोत्रे व रुपेश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे शहराध्यक्ष गोविंद राज ठाकर यांनी आयोजित केला होता. 


या गौरव सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पुर्णा तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष डॉ.जयप्रकाश मोदाणी तर स्वागताध्यक्ष म्हणून परभणी जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष रुपेश  सोनटक्के तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उपाध्यक्ष यादव महात्मे, गंगाखेड तालुकाध्यक्ष राहुल डोंगरे यांच्यासह पुर्णा तालुकाध्यक्ष अनिल बुचाले यांची प्रमुख उपस्थिती होती.

पवन बोबडे तालुका अध्यक्ष मनविसे, मारोती घोडसे उप तालुकाध्यक्ष, ओम यादव शहर सरचिटणीस, पंकज राठोड, राजेश यादव, अविनाश मैत्रे उप शहर अध्यक्ष, भारत बोबडे, शहर अध्यक्ष मनविसे शशिकांत सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते या सर्व मान्यवरांच्या हस्ते पूर्णा शहर व ग्रामीण भागातील सर्व कार्य सेवकांचा व पुर्णा शहरात राम जन्मोत्सव साजरी करणारे सर्व रामभक्त यांचा हार, शाल, श्रीफळ, व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमात कार सेवक श्री प्रभूदयाल ओझा, व ॲड शिवप्रसाद सोनी यांनी कार सेवेच्या जुन्या आठवणींना  उजाळा देत आपले मनोगत व्यक्त केले.


कार्यक्रमाचे आयोजन गोविंद राज ठाकर शहर अध्यक्ष यांनी केले राधेश्याम महामुने,योगेश खंदारे ,वैभव जिरवणकर, शिवानंद कापसे, यांच्यासह मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले या गौरव सोहळ्यास पुर्णा शहरातील सर्व हिंदू समाज बांधव व कारसेवक रामभक्त व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या