🌟ओबीसी एल्गार सभांमध्ये सोनार समाजाला प्रतिनिधित्व मिळावे - गजाननराव घोडके


🌟नाशिक येथील आयोजित बैठकीत सोनार समाजाची मागणी🌟

नाशिक : नाशिक येथील सोनार समाजाचे लढवय्ये कार्यकर्ते श्री गजाननराव घोडके यांच्या यांच्या नाशिक येथील निवासस्थानी काल रविवार दि.०४ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ०४.३० ते ०६.०० वाजेच्या दरम्यान आयोजित बैठकीत विश्वकर्मा योजनेचा लाभ आणि मार्गदर्शन सर्व शाखीय सोनार समाजातील बेरोजगार युवक आणि युवती, सुवर्ण कारागीर तसेच व्यावसायिकांना कसे मिळवून देता येईल, यासंदर्भात चर्चा झाली. तसेच मराठा ओबीसी आरक्षण हरकत अर्जासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. नाशिक महानगरातून ओबीसी समाज बांधव आणि भगिनी यांच्याकडून बहुसंख्येने हरकत अर्ज कसे पाठविता येतील, यासंदर्भात देखील चर्चा झाली.

त्यानंतर सर्व शाखीय सोनार समाजाची आगामी पिढी असलेल्या शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी - विद्यार्थिनी यांना ओबीसी आरक्षण संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी एक सहविचार मेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला ओबीसी एल्गार सभांमध्ये सोनार समाजाला प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी ओबीसी नेते ना छगनराव भुजबळ यांच्या भेटीसाठी सोनार समाजाचे शिष्टमंडळ नेण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात श्री राजाभाऊ सोनार यांनी श्री समीरभाऊ भुजबळ यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून ओबीसी नेते ना. भुजबळ यांच्या भेटीची वेळ उपलब्ध करून द्यावी, यासंदर्भात चर्चा केली. श्री समीरभाऊ भुजबळ यांनी लवकरच सोनार समाजाच्या शिष्टमंडळास ओबीसी नेते ना. भुजबळ यांची वेळ उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन दिले.

त्यानंतर ना. छगनराव भुजबळ यांचे निकटवर्तीय श्री दिलीपअण्णा खैरे यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यासाठी त्यांच्या  निवासस्थानी निवडक समाज बांधव आणि भगिनी गेले. श्री खैरे हे सकाळीच काही कामानिमित्त बाहेरगावी गेल्याने भेट होऊ शकली  नाही. परिणामी, त्यांचे अभिष्टचिंतन भ्रमणध्वनीवर संपर्क साधून करण्यात आले.यावेळी विश्वकर्मा योजनेसंदर्भात युनिव्हर्सल विश्वकर्मा फाउंडेशन चे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री शांतारामशेट दुसाने यांनी मार्गदर्शन केले. ओबीसी एल्गार समितीत सोनार समाजाला प्रतिनिधित्व कसे मिळवून देता येईल, यासंदर्भात श्री राजाभाऊ सोनार,ओबीसी सुवर्णकार समिती महाराष्ट्र राज्य चे प्रदेशाध्यक्ष श्री गजाभाऊ घोडके, श्री सुभाष बुऱ्हाडे,श्री दिलीपराव देवरे यांनी मार्गदर्शन केले. 

मराठा ओबीसी आरक्षण हरकत अर्ज मोहिमेच्या निमित्ताने सर्व शाखीय सोनार समाजाचे अभेद्य संघटन कसे करता येईल, यासंदर्भात श्री राजाभाऊ सोनार, श्री शांतारामशेट दुसाने, माळवी सोनार शाखेचे नाशिक जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र शेरेकर, ज्येष्ठ सोनार समाजसेवक श्री सुरेश बी सोनवणे, *सकल भारतीय सोनार समाज संघटन* चे संस्थापक श्री मिलिंदकुमार सोनार यांनी मार्गदर्शन केले.

श्री राजाभाऊ सोनार यांनी प्रास्ताविक केले, तर श्री सुभाष बुऱ्हाडे यांनी आभार मानले. बैठकीस सर्व शाखीय सोनार समाज बांधव आणि भगिनी यांची लक्षणीय उपस्थिती होती. 

या बैठकीस विश्वकर्मा योजनेसंदर्भात मार्गदर्शन होणार असल्याने सर्व शाखीय सोनार समाजातील युवक आणि युवती यांची विशेष उपस्थिती होती.

- मिलिंदकुमार सोनार

संस्थापक, *सकल भारतीय सोनार समाज संघटन*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या