🌟समनक जनता पार्टीने निवडणुकीचे रणसिंग फुंकले....!


🌟समनक जनता पार्टीचा जिल्हास्तरीय मेळावा उत्साहात : प्रा.डॉ. अनिल राठोड यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर🌟


✍🏻फुलचंद भगत

वाशिम :- समनक जनता पार्टीने होऊ घातलेली लोकसभा निवडणुक ताकतीने लढण्याचा निर्धार केला आहे.  स्थानिक महालक्ष्मी लॉन येथे दि.  10 फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या जिल्हास्तरीय मेळाव्यात हजारो कार्यकर्त्याच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीचे रणसिंग फुंकले गेले.


या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी समनक जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. रामकृष्ण कालापाड हे होते.  यावेळी विचारपीठावर पक्षाचे राष्ट्रीय नेते प्रा.  डॉ.  अनिल राठोड,  विभागीय महासचिव प्रा.अनिल बळी, नॉमेडिक वेलफेयर असोसीएशन चे    प्रदेशाध्यक्ष टी एस चव्हाण, सहसचिव पुंडलिक धनगर, डॉ. सचिन पवार,  जिल्हाध्यक्ष गजानन धामणे,  महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ. शितल राठोड,  मंगरुळपीर तालुकाध्यक्ष सौ. नीता चव्हाण,  मानोरा तालुकाध्यक्ष सौ. सोनू खडसे,  उपाध्यक्ष उल्हास राठोड,  अजय सोनूनकर, शहराध्यक्ष रवींद्र काळे,  अँड. संगीता राठोड,  सौ. प्रमिलाताई आडे, सौ. संगीताताई जाधव,  पंचाळा ग्रामपंचायत च्या उपसरपंच सौ.  वंदना ताजणे,सदस्य किसनराव इरतकर,भीमराव इंगोले, धुमका ग्रामपंचायतच्या उपसरपंच सौ. गिताबाई धुळे,भटक्या विमुक्त जाती जमाती असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष राजू अवताडे,रोहिदास राठोड, चंदूभाई बेनिवाले, युसूफ बेनिवाले, अंजनसिंग अंद्रेली, पापासिंग बावरी, मनीषा भगत, वैशाली दायदार, छाया राठोड, काव्या खोलगडे,  नांदेड जिल्हाध्यक्ष निळू पवार आदींची विचारपिठावर उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कु. यशोमती गजानन धामणे हिने सादर केलेल्या संविधानाच्या प्रास्ताविकेने कार्यक्रमाची सुरुवात झाली.  


जिल्हाध्यक्ष गजानन धामणे यांनी प्रास्ताविकेतून कार्याचा आढावा सादर केला. आणि लोकशाही वाचवण्यासाठी हा पक्ष कार्य करीत असल्यामुळे गावागावातून अनेक लोक  स्वखर्चाने या राजकीय चळवळीतील सहभागी होत असल्याचे सांगितले. यावेळी प्रदेशाध्यक्ष डॉ.  रामकृष्ण कालापाड यांनी वाशिम - यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून प्रा. डॉ. अनिल राठोड यांचे नाव जाहीर केले.  यावेळी टाळ्यांच्या प्रचंड कडकडाट आणि मोठा हार घालून प्रा. डॉ. राठोड  यांच्या उमेदवारीचे  कौतुक करण्यात आले. याप्रसंगी प्रा. डॉ. आणि राठोड यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आजघडीला सत्ताधाऱ्यांनी लोकशाही आणि संविधान संपविण्याचा डाव आखला आहे.  जनतेला गुलाम बनविण्याचे षडयंत्र सुरू आहे.  इथल्या सरकारी शाळा बंद करायला सुरुवात केली आहे.  सरकारी नोकर भरती बंद करून खाजगी कंपन्यांना नोकर भरतीचे अधिकार देऊन नोकऱ्यांचे खाजगीकरण केले जात आहे.  पर्यायाने नोकऱ्यांमध्ये आरक्षण संपुष्टात आणले जात आहे.  शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव न देऊन देशोधडीला लावले जात आहे.  ईव्हीएम मशीन मध्ये गडबडी करूननागरिकांच्या मताधिकारावर गदा आणली जात आहे.  म्हणून खऱ्या अर्थाने लोकशाही वाचविण्यासाठी आणि 85 टक्के बहुजनांना राजसत्तेत पाठविण्यासाठी समनक जनता पार्टी कार्य करणार असल्याचे प्रा.  डॉ. राठोड म्हणाले. 

 यावेळी प्रा. अनिल बळी,  प्रा.  टी एस चव्हाण,  पुंडलिक धनगर, शितल राठोड आदींनी मनोगत व्यक्त केले.  यावेळी अध्यक्षीय भाषणातून डॉ.  रामकृष्ण कालापाड यांनी सांगितले की, इथल्या प्रस्थापित पक्षांनी ओबीसी,  एससी,  एसटी,  भटके विमुक्त आणि धार्मिक अल्पसंख्यांकांच्या मतांचा केवळ वापर केला आहे आणि त्यांना कायम हक्क आणि अधिकारांपासून दूर ठेवले आहे.  आता हा संपूर्ण बहुजन समाज जागा झाला असून कुठल्याही प्रस्थापित राजकीय पक्षाला भीक घालणार नाही. जातीच्या आणि धर्माच्या नावावर त्यांचा राजकीय स्वार्थासाठी कदापिही वापर होऊ देणार नाही.  हा संपूर्ण बहुजन वर्ग आता आपल्या हक्काच्या समनक जनता पार्टीच्या माध्यमातून राजसत्ता प्राप्त करणार आहे.  सत्तेत जाण्यापासून आता आम्हाला कोणीही रोखू शकणार नाही असे रोखठोक प्रतिपादन डॉ.  कालापाड यांनी केले आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये समनक जनता पार्टीच्या उमेदवारांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.  यावेळी डॉ.  कालापाड, प्रा.  राठोड,  गजानन धामणे,  सौ शितल राठोड यांनी उपस्थित पंचाळा ग्रामपंचायत च्या उपसरपंच वंदना ताजने,  सदस्य भीमराव इंगोले, धूमका ग्रामपंचायतच्या उपसरपंच गीता धुळे यांच्यासह अनेक महिला व पुरुषांचा पक्षाचा शेला घालून आणि पुष्पगुच्छ देऊन पक्षप्रवेश घेतला.  यावेळी विविध पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.  यामध्ये समनक जनता पार्टीच्या जिल्हा महासचिवपदी धीरज राठोड यांची निवड करण्यात आली.  तसेच  समनक जनता पार्टीच्या कामगार आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी वाशिम तालुक्यातील सुरकंडी येथील रहिवासी आणि कामगारांसाठी अहोरात्र काम करणारे चंदूभाऊ बेनीवाले यांची निवड करण्यात आली.  कोषाध्यक्षपदी युसूफ बेनिवाले यांची निवड करण्यात आली.  यावेळी मालेगाव तालुका उपाध्यक्षपदी चंदन राठोड,  महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी सौ.  शिल्पा समीर पाटील, मालेगाव तालुका उपाध्यक्षपदी काशिनाथ नागरे आदींची निवड करण्यात आली.  कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन यशवंत पवार यांनी केले तर आभार शहराध्यक्ष रवींद्र काळे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसह हजारो नागरिक उपस्थित होते.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या