🌟यामुळे नांदेड-मनमाड-नांदेड एक्सप्रेस अंशतः रद्द🌟
परभणी (दि.27 फेब्रुवारी) : नांदेड दक्षिण मध्य रेल्वे विभागातील रेल्वे पटरीच्या देखरेखी व दुरुस्ती करीता रोलिंग कोरीडोर ब्लॉक घेण्यात आला आहे, यामुळे नांदेड-मनमाड-नांदेड एक्सप्रेस काही दिवस अंशतः रद्द करण्यात आली असून नगरसोल - काचीगुडा एक्सप्रेस काही दिवस उशिराने धावेल, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या नांदेड येथील जनसंपर्क विभागाने दिली.
गाडी क्रमांक 07777 नांदेड ते मनमाड ही एक्सप्रेस 26 फेब्रुवारी ते 24 मार्च दरम्यान नांदेड ते पूर्णा दरम्यान तर गाडी क्रमांक 07778 मनमाड ते नांदेड ही एक्सप्रेस 26 फेब्रुवारी ते 24 मार्च दरम्यान पूर्णा ते नांदेड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. तसेच गाडी क्रमांक 17662 नगरसोल ते काचीगुडा एक्सप्रेस 26 फेब्रुवारी ते 24 मार्च दरम्यान सेलू ते नांदेड दरम्यान 120 मिनिटे उशिराने धावणार आहे.......
0 टिप्पण्या