🌟होतं करू संगीत प्रेमींसाठी स्वरा काम करेल - प्राचार्य डॉ.सुरेश सदावर्ते


🌟स्वरा संगीत अकादमीच्या उदघाटन प्रसंगी बोलतांना ते म्हणाले🌟 

परभणी (दि.२० फेब्रुवारी) - छत्रपती शिवाजी महाराजांच्या 394 व्या जयंतीचे पावन औचित्य साधून स्वरा संगीत अकादमीचे उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. सुरेश सदावर्ते यांनी मोहमद रफी चे एक गीत सादर करून उदघाट्न झाल्याची घोषणा केली. 'बोबडे निवास' वीर सावरकर चौक, विद्यानगर या ठिकाणी अकादमी स्थापन करण्यात आली आहे. होतकरू संगीत प्रेमींना या ठिकाणी विविध वाद्यासह संगीत शिकण्याची अत्यंत महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध झाली आहे. दर्दी पण वंचित घटकांना मोफत संगीत शिकता येऊ शकेल. 

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गझलकार प्रा. राहुल अपशेट्टी, डॉ. सुशील भोसले, डॉ. संजय खिल्लारे, पत्रकार शिवशंकर सोनुने, संघपाल आढागळे, डॉ. सुनील तुरुकमाने, मोहन भोकरे, तालमणी सुभाष जोगदंड, शाहीर नामदेव लहाडे, आदी उपस्थित होते.कार्यक्रमात विविध गीत गायन झाले. यात संगीता मुळे, मोहन चांडक, सुधीर पाटील, कारभारी हजारे, स्वरा शिरसाठ, ललिता शिरसाठ, अदिती बोबडे, सहर्ष शिरसाठ आदींनी आपली कला सादर केली. साथ संगत मोहन भोकरे, सुभाष जोगदंड आदींनी केली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कपिल वाटोडे, संदीप वायवळ, संजय बोबडे, दैवशाला गायकवाड, डॉ. अशोक शिरसाठ यांनी परिश्रम घेतले. प्रस्तावना प्रा. राजकुमार मनवर यांनी केली तर सूत्रसंचालन डॉ. ललिता शिरसाठ यांनी केले. शेवटी सर्व उपस्थित संगीत प्रेमींचे आभार. डॉ. सुनील तुरुकमाने यांनी मानले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या